तुमच्या शहरातही रिलायन्सची स्टोअर्स बंद होताय? जाणून घ्या कारणं..

Mukesh Ambanies Relince Retail Stores will close if not in profit by new policy : एकीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या नवनवीन लॉन्च होणाऱ्या आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणाऱ्या कंपन्यांबद्दल दररोज काही ना काही बातम्या येत असतात मात्र यावेळी एक नकारात्मक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओपन स्टोअर्ससाठी एक फर्मान जारी केलं आहे. त्यामुळे आता या स्टोअर्सवर टाळं ठोकण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मात्र रिलायन्स रिटेलवर ही वेळ का आली? कंपनी तोट्यात आली आहे का? हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर…
नेमकं प्रकरण काय?
धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे जेष्ठ सुपुत्र मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा कारभार हाती घेत रिलायन्सला पेट्रो-केमिकल्सपासून टेलिकॉम, रिटेल ते डिजिटलपर्यंत घेऊन आले. या यशामागील मुकेश यांच्या रणनितीबद्दल सांगायचं झालं तर ग्राहकांना सुरुवातीला फ्री डेटा देऊन त्यांनी मोठा ग्राहक खेचून घेणे आणि स्पर्धक कंपन्यांच्या नाकी नऊ आणणे. मात्र जेव्हा त्यांनी रिटेलमध्ये एन्ट्री केली तेव्हा त्यांनी नवीनिती वापरली ती म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ग्राहकांसाठी त्यांच्या गरजांनुसार वेगवेगळे स्टोअर्स उघडले.
लाडकी बहिण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीसाठी कसरत करावी लागतेय; आरोग्यमंत्री आबिटकरांची कबूली
फळ, भाज्या आणि इतर ताज्या पदार्थांसाठी रिलायन्स फ्रेश आणि फ्रेश पीक नावाने स्टोअर्स उघडली गेली. कपड्यांसाठी ट्रेड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी रिलायन्स डिजिटल, दागिन्यांसाठी रिलायन्स ज्युल्स, त्यांच्या रणनितीमुळे रिलायन्स रिटेल तेजीने पसरले. त्यांची निती म्हणजे सुरूवातीला कोणत्याही व्यवसायात भक्कम आणि जलद गुंतवणूक करायची आणि स्पर्धकांना नामोहरम करून नफा कमवायचा. त्यामुळे त्यांचे व्यवसाय सुरूवातीला जरी तोट्यात असले तरी ते भविष्यातील नफ्याकडे लक्ष देतात.
“आता निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही”, शिंदेंच्या सभेला दांडी अन् केसरकरांचे निवृत्तीचे संकेत
मात्र आता त्यांच्या रिलायन्स रिटेल या बिझिनेसबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अंबानी आता त्यांची स्ट्रॅटेजी बदलत आहेत. त्यांना लॉन्गटर्मची वाट पाहण्यात नाही तर रिलायन्स रिटेलमधून लवकरात लवकर नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार आता रिलायन्स रिटेलसाठी आदेश देण्यात आले आहेत. की, स्टोअर्स सुरू केल्यानंतर 6 ते 12 महिन्यांत त्यांना त्यांचा सर्व खर्च उचलता आला पाहिजे. जे स्टोअर्स असा परफॉर्मन्स दाखवणार नाही त्यांना बंद करण्यात येईल किंवा त्यांना दुसऱ्या फॉरमॅटमध्ये बदलले जाईल. या अगोदर रिलायन्स या स्टोअर्सला नफा कमावण्यासाठी 2 वर्षांपर्यंतचा कालावधी देत होतं.
मात्र रिलायन्स रिटेलने ही रणनिती का बदलली पाहूयात…
रिलायन्स रिटेल त्यांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांना आपला फायनान्शिअल परफॉर्मन्स चांगला असणे गरजेच आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त नफ्यात असणे, मार्जिन आणि व्हॅल्यूएशन चांगले असणे. यावर भर देत आहे. दुसरीकडे ते एका वर्षांत हजारहून अधिक नवे स्टोअर्स उघडत होते. ते देखील कमी केलं जाणार आहे. कारण मोठा विस्तार करण्याचे दिवस नाहीत.
शिंदे कसले वाघ? काही झालं की ते गावी पळून जातात…; अंबादास दानवेंनी डिवचलं
तरी देखील दरवर्षी नवे स्टोअर्स उघडले जाणार असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं. तसेच स्टोअर्सचे लोकेशन्सवर ही लक्ष दिले जाणार आहे. याच रणनितीच्या आधारे कंपनीने स्टोअर्सला उभारण्यासाठी लागणारा खर्च देखील न काढणाऱ्या तब्बल 3,650 हून अधिक स्टोअर्स गेल्या 3 वर्षात बंद केले आहे. तर कपड्यांसाठी असणाऱ्या ट्रेड्स देखील आणखी अद्ययावत करून नव्या रूपात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर रिलायन्स आता 30 मिनिटमध्ये डिलीव्हरी देखील देणार आहे. तर रिलायन्स रिटेलच्या टर्न ओव्हरबद्दल सांगायचे झाल्यास 2.91 लाख कोटी आहे. तुम्हाला रिलायन्सच्या या नव्या पॉलिसीबद्दल काय वाटतं? तुमच्या आसपास रिलायन्स रिटेलचे स्टोअर्स बंद पडले कींवा ग्राहक कमी झाले असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.