शिंदे कसले वाघ? काही झालं की ते गावी पळून जातात…; अंबादास दानवेंनी डिवचलं

शिंदे कसले वाघ? काही झालं की ते गावी पळून जातात…; अंबादास दानवेंनी डिवचलं

Ambadas Danve On Eknath Shinde : ठाकरे गट (UBT) आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)जोरदार टीका केली. शिंदे कसे वाघ? जेव्हा अडचण येते, तेव्हा ते गावावकडे पळून जातात, अशी बोचरी टीका दानवेंनी केली.

लाडकी बहिण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीसाठी कसरत करावी लागतेय; आरोग्यमंत्री आबिटकरांची कबूली 

अंबादास दानवेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेसाठी दरमहा सुमारे ३३५ ते ४१० कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासी कल्याण खात्यातून वगळले जात आहे. हे दोन्ही विभाग संवेदनशील असून हा निधी वळवल्यामुळं आदिवासी आणि मागासवर्गीय समुदायांवर अन्याय होत आहे. या खात्याचा निधी वळवणं चुकीचं आहे. सरकार आर्थिक संकटात आलंय, म्हणून ते इकडून तिकडे निधी वळवत आहेत. राज्य सरकारचे अर्थ खात्यावर कोणतेही नियंत्रण नाही, असं दानवे म्हणाले.

“आता निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही”, शिंदेंच्या सभेला दांडी अन् केसरकरांचे निवृत्तीचे संकेत 

पुढं ते म्हणाले, अजितदादा सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात, त्यांचं खातं निधी वळवण्याचं कामं करतय आणि त्याला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे. मुख्यमंत्र्याच्या सहमतीशिवाय हे होऊ शकत नाही, आदिवासी समुदांवर आर्थिक अन्याय होत असून याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, असंही दानवे म्हणाले.

संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री आहे. त्यांना त्यांच्या खात्यात काय चाललंय माहिती आहे का नाही? त्यांना विचारले जातं की नाही, याचीही शंका आहे, असा टोला दानवेंनी लगावला.

सरकारवर फक्त घोषणा करते
संजय गांधी निराधार योजना अजूनही अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकार फक्त मोठमोठ्या घोषणा करते, पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही, अशी टीका दानवेंनी केली.

यावेळी दानवेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याच्या खात्याचा निधी काढला जातो, त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचाच निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवला जातो. तरी ते बोलत नाहीत, ते गप्प आहेत. ते कसले वाघ? जेव्हा अडचण येते, तेव्हा ते गावावकडे पळून जातात, हा दात आणि नख काढून टाकलेला वाघ आहे, अशी टीका दानवेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube