नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, कठोर शिक्षा होणार; PM मोदी पहिल्यांदाच बोलले

PM Modi On NEET Paper Leak  : देशाची राजधानी दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण

PM Modi On NEET Paper Leak
PM Modi On NEET Paper Leak  : देशाची राजधानी दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो तरुण आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी एनडीए खासदारांच्या मंगल मिलन बैठकीत बोलताना दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले की, नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी (PM Modi) नमूद केले की, पेपरफुटीचे वृत्त समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली, ज्यामुळे 13 जणांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीट (NEET) परीक्षेची फेरपरीक्षा घेण्यालाही प्राधान्य देण्यात आले. तसेच  नीट पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा दिली जाईल. पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही. उलट, या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
 तर दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनेक विद्यार्थीं आंदोनल करत आहे. काल (20 जुलै) हजारो विद्यार्थांनी संसदेवर मोर्च्या काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहे. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या आंदोलनादम्यान 118 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आताप्रर्यंत पाच एफआयआर देखील दाखल केले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

follow us