Nikki Yadav Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

Nikki Yadav Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

नवी दिल्ली : हरियाणातील झज्जरमधील खेडी खुम्मर गावात राहणाऱ्या निक्की यादवची (Nikki Yadav) तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरात प्रियकर साहिल गेहलोतने (Sahil Gehlot) गर्लफ्रेंड निक्कीची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. गर्लफ्रेंड निक्की यादवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपी साहिल गेहलोत (24) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी हत्येच्या एक दिवस आधी 9 फेब्रुवारी रोजी निक्कीच्या दिल्लीतील घरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पाहून काही वेळाने निक्कीची हत्या होईल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता.

प्रकरण नेमकं आहे तरी काय?
2018 मध्ये, दिल्लीच्या नजफगढच्या मित्राव गावात राहणाऱ्या साहिलची हरियाणाच्या झज्जरमध्ये राहणाऱ्या निक्की यादवसोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. मात्र साहिलच्या घरच्यांनी साहिलला त्यांच्या इच्छेनुसार लग्नासाठी दबाव टाकला व साहिलने घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न करण्यास होकार दिला.

9 तारखेला एंगेजमेंटची तारीख आणि 10 फेब्रुवारीला लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. 9 फेब्रुवारीला साहिलची एंगेजमेंट झाली. हा प्रकार निक्कीला समजताच तिचे साहिलसोबत भांडण झाले. यानंतर 9 फेब्रुवारीला साहिलने निक्कीला घरी बोलावले. त्यानंतर त्यांनी निक्कीची हत्या केली. तो मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवून तो त्याच्या घरी गेला आणि 11 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. मात्र या हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी निक्कीचा मृतदेह फ्रीझमधून बाहेर काढला आहे.

Jitendra Awhad : महेश आहेर यांच्या ऑफिसमध्ये नोटांचा ढीग, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्विट

हत्यापुर्वी निक्कीचे दोन सीसीटीव्ही फुटेज आले समोर
पोलिसांनी निक्कीच्या उत्तम नगर येथील घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढले आहे. पहिले फुटेज दुपारी 1.10 चे आहे. यामध्ये निक्की कपडे घेऊन वरच्या मजल्यावर घरात जाताना दिसत आहे. आणि दुसरे फुटेज, जे रात्री 9.27 वा. ती परतताना दिसते. सध्या, पोलिसांचे म्हणणे आहे की ते अधिक पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत, जेणेकरुन हत्येच्या दिवशीच्या घटनांचा क्रम समजू शकेल.

असा झाला हत्याकांडाचा उलगडा…
निक्कीचे वडील सुनील यादव यांचे साहिलशी पटत नसल्याने त्यांनी दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये त्याच्या ओळखीच्या एका पोलिसाची मदत घेतली. यानंतर निक्कीच्या फोनवर क्राईम ब्रँचने पाळत ठेवली. नजफगडमधील मित्राव गावाजवळील एका ढाब्यावर त्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी ढाब्यावर पोहोचून फ्रीजमध्ये पाहिले असता त्यात निक्कीचा मृतदेह सापडला.

यानंतर पोलिसांनी साहिलचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याला दिल्लीच्या खैर गावातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने निकीची हत्या करून मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवल्याचे सांगितले. बाबा हरिदास नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube