Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाडांपासून माझ्या कुटुंबाला धोका, महेश आहेरांचा दावा
ठाणे : ‘ती Audio क्लिप मी ऐकलेली नाही तो आवाज कुणाचा आहे हे मी सांगू शकत नाही. पण मी 5 जानेवारीला नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक एफआरआय दाखल केली होती. की, माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. मी त्या गुन्हेगाराची ऑडियो क्लिप पोलिसांना सादर केली आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचाही (Jitendra Awhad) उल्लेखही करण्यात आला होता. तर या गुन्हेगाराला अटकही झाल्याची माहिती ठाणें महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांनी दिली आहे.
‘पुढे त्यांनी सांगितलं की, 2019 पासून मी मुंब्रातील अनधिकृत बांधकाम पाडली. त्यामुळे मला कुटुंबासह संपवण्याच्या धमक्याही येत होत्या. तसेच आव्हाडांनी मला त्यांच्या मतदारसंघात विचारल्या शिवाय कोणतेही काम करण्यास मनाई केल्याचं देखील महेश आहेर यांनी सांगितलं आहे. हे सर्व मी आयुक्तांसमोर जाहीर करणार आहे. माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे.’
दरम्यान ठाणें महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना पालिका मुख्यालय आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर या जीवघेणा हल्ला प्रकरणावर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावईला जीवे मारण्याची धमकी देणारी एक Audio क्लिप सध्या वायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांकडून ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांना मारहाण करण्यात आली. कथित ऑडिओमध्ये महेश आहेर यांनी बाबाजी नावाच्या शुटरला सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याला खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर दुजोरा दिला आहे.
अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी Jitendra Awhad यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
आव्हाडांच्या सांगण्यावरूनच हल्ला झाला…
महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी हल्ला केला. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.