आता लवकरच हवेत उडणारी बसही आणणार; नितीन गडकरींचा मोठी घोषणा

Nitin Gadkari: रोपवे आणि केबल कार आपण सुरू केल्या आहेत. पाण्यावर उतरणारे विमानही आणले होते.

  • Written By: Published:
Nitin Gadkari

Nitin Gadkari Announces Flying Bus: उत्तर प्रदेशातील दोन प्रमुख शहरे लखनऊ आणि कानपूर यांना जोडणाऱ्या नव्या एक्सप्रेस हायवेच उद्घाटन नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्या हस्ते करण्यात आले आहेत. त्यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मी येत्या काळात अनेक नवीन तंत्रज्ञान देशात आणणार आहे. रोपवे आणि केबल कार आपण सुरू केल्या आहेत. पाण्यावर उतरणारे विमानही आणले होते. आता हवेत उडणारी बसही आणणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका घोषणेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या 63 किलोमीटर लांबीच्या कानपूर-लखनऊ एक्सप्रेस वेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी ते म्हणाले, यासाठी माझ्या मंत्रालयाअंतर्गत इलेक्ट्रिसिटीवर आधारित ‘मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’ विकसित केली जाणार आहे. त्यामुळे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास कधी पूर्ण होईल, हेही कळणार नाही.

कसा आहे कानपूर-लखनऊ एक्सप्रेस वे?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत उन्नाव जिल्ह्यातील नेवरना पडरीखुर्द येथे या एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या एक्सप्रेस वेच्या सुरूवातीमुळे लखनऊ आणि कानपूरमधील प्रवासाचा कालावधी तब्बल 3 तासांवरून केवळ 40 मिनिटांवर आला आहे. उद्घाटनानंतर तिन्ही नेत्यांनी उन्नाव ते लखनऊच्या सरोजिनी नगरपर्यंत कारमधून प्रवास करत एक्सप्रेसवेची चाचणी घेतली. या एक्सप्रेसवेवर ताशी 120 किलोमीटर ही कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच फक्त चारचाकी आणि अवजड वाहनांनाच या मार्गावर प्रवेश असेल, तर दुचाकी वाहनांना या एक्सप्रेसवेवर परवानगी दिली जाणार नाही.

follow us