महिला आरक्षणांवर राजकारण नको; पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आवाहन
PM Modi On Women Reservation Bill : आजपासून लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi On Women Reservation Bill : आजपासून लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज या चर्चेत भाग घेत या विधेयकावर राजकारण करु नका असं आवाहन विरोधकांना केले आहे. उद्या या विधेयकावर लोकसभेत मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या विधेयकावर राजकारण करु नका असं आवाहन केले आहे.
लोकसभेत (Lok Sabha) बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, सर्वसामान्य महिलांचा आवाज या सभागृहात नवी शक्ती बनेल. देशाच्या प्रगतीत महिलांचं महत्तवपूर्ण योगदान आहे. सामूहिक शक्तीमुळे नेहमीच चांगले निकाल पाहायला मिळतात. त्यामुळे जुन्या मर्यादांमधून बाहेर पडून नारीशक्तीला संधी देण्याची ही वेळ आहे असं लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या विधेयकावर राजकारण करु नका असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
तर हा 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. विरोधी पक्षांनी याला पाठिंबा दिला पाहिजे, कारण त्यामुळे त्यांना फायदा होईल. जे आज याला विरोध करतील, त्यांना दीर्घकाळ त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना दिला आहे.
प्राजक्त तनपुरेंचे भाजपमध्ये स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहुरीत काय म्हणाले?
तर दुसरीकडे महिला आरक्षणांतर्गत होणारी परिसीमनाची प्रक्रिया कोणाशीही भेदभाव करणार नाही आणि राज्यांच्या लोकसंख्येचे जे प्रमाण सध्या आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. याचबरोबर या विधेयकामुळे दक्षिण भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही अशी देखील माहिती पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना दिली.