Odisha Health Minister Dies: ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन

Odisha Health Minister Dies: ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन

भुवनेश्वर : गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं उपचार घेत असताना निधन झालंय. आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर आज दुपारच्या दरम्यान, झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ गोळीबार करण्यात आला होता. गांधी चौकाजवळ दास यांच्याच सुरक्षेत असलेल्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरने गोळीबार केला होता.

त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरु असतानाच त्यांचं निधन झालं आहे. ओडिशाचे (Odisha) आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ जिवघेणा हल्ला झाला आहे.

घटनेसंदर्भात आता एएसआयच्या पत्नीने माहिती दिली आहे, सकाळी एएसआयने त्याच्या मुलीला व्हिडीओ कॉल केला होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून घरी देखील गेला नव्हता. त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते अशी देखील माहिती समोर आली आहे.

मंत्री दास हे ठरलेल्या वेळेनूसार कार्यक्रमांच्या ठिकाणी जात होते. ज्या ठिकाणी त्यांना कार्यक्रमाला जायचं होतं, त्या ठिकाणी दास कारमधून बाहेर आले असता., त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एका एएसआयने त्यांच्यावर गोळ्या झाडली.

दास यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर बीजेडीचे कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान, नाबा दास यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता असे म्हटलं जात आहे. कारण त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे नाबा दास यांना पोलिस संरक्षण देण्यात आलेले असताना हा हल्ला झाला.

दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नाबा दास यांच्यावर गोळीबार केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube