DRDO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हेरगिरीबद्दल अटक

DRDO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हेरगिरीबद्दल अटक

मुंबई : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थातच डीआरडीओ (DRDO) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ओडिशशातून अटक करण्यात आली. भारताच्या संरक्षण क्षेत्राशी (India Defence Sector) संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) याविषयी अधिक माहिती दिली.

दरम्यान, या अधिकाऱ्याविरुद्ध भादंसं (IPC) कलम 120A आणि 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, शिवाय अधिकृत गुप्तता कायद्यानुसार त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओचा हा 57 वर्षीय अधिकारी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात असणाऱ्या चांदीपूर येथे कर्तव्यावर होता. तो डीआरडीओच्या एकात्मिक चाचणी श्रेणी येथे कर्तव्य बजावत असे. चांदीपूरमध्ये DRDO च्या पीएक्सई आणि आयटीआर अशा दोन चाचणी श्रेणी आहेत.

पूर्व भागाचे पोलीस महानिरीक्षक हिमांशू कुमार लाल यांनी माहिती देताना सांगितले की, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने क्षेपणास्त्र चाचण्यांसंबंधीत काही संवेदनशील माहिती परदेशी गुप्तहेरांना यशस्वीरित्या पाठवली असल्याची ठोस माहिती हाती लागली आहे. बालासोरचे पोलीस अधीक्षक (एसपी) सागरिका नाथ यांनी म्हणाले, अधिक चौकशी केल्यानंतर त्याने विदेशी गुप्तहेरांबरोबर सामायिक केलेला तपशील जाहीर केला जाऊ शकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube