One Nation-One Election : एक देश-एक शिक्षण पद्धत राबवा, केजरीवालांचा भाजपला सल्ला

  • Written By: Published:
Arvind Kejriwal

One Nation-One Election : एक देश-एक निवडणुकीसाठी (One Nation-One Election) केंद्र सरकारने समितीही गठीत केली आहे. यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. त्यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी यांनी यावरून केंद्रावर टीका केली आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. एक देश-एक निवडणूक ही कल्पना संघ आणि सर्व राज्यांतील हल्ला असल्याचे राहुल गांधी म्हटले आहे. तर आता आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ही याला विरोध दर्शविला आहे. एक देश-एक निवडणुकीपेक्षा एक देश एक शिक्षण हे राबविले पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांची आहे.

Jalna Maratha Protest : पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी; कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हरियाणातील भिवानी येथे आपच्या कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, एक देश-एक निवडणूक हा भारतीय जनता पक्षाचा नवीन चोचला आहे. त्याचा देशातील सर्वसामान्य जनतेला काहीच फायदा होणार नाही. यातून देशाला काय मिळणार आहे. एक देश-एक निवडणूक एेवजी एक देश एक शिक्षण, एक देश एक उपचार हा निर्णय घेतला पाहिजे. त्यातून सर्वांना चांगले शिक्षण आणि चांगले आरोग्य मिळाले पाहिजे.

‘वन नेशन-वन इलेक्शन देशातील सर्व राज्यांवर हल्ला’; राहुल गांधींची पहिलीच प्रतिक्रिया

दिल्ली आणि पंजाब राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर हरियाणामध्ये आम्ही सरकार बनवू, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला. केजरीवाल म्हणाले, एक दिवस आम आदमी पक्षच भाजपला देशातून संपवून टाकेल. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही.

आता सिसोदिया हे तुरुंगात आहे. तर सत्येंद्र जैन हे एक वर्ष तुरुंगात राहिले आहेत. आता सिसोदिया हे भाजपमध्ये दाखल झाल्यास त्यांना लगेच जामीन मंजूर होईल. तर सत्येंद्र जैनही भाजपमध्ये गेल्यास त्यांच्याविरुध्दची खटलेही रद्द होतील. परंतु हे दोघेही तसे करणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.

Tags

follow us