Sunny Leone मुळे पाकिस्तानात राजकीय वातावरण चिघळले ; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील आर्थिक संकट असतानाच राजकीय संकट (Pakistan Politics) असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येथील राजकीय नेत्यात एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांच्या पाकिस्तान एहरीक-ए-इंन्साफ पक्षाचे (PTI) नेते फैयाज उल हसन (Fayyaz Ul Hassan) यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज (Maryam Nawaz) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. ही टीका करताना त्यांनी अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) उल्लेख केला. सनी लिओनीचा उल्लेख करत पाकिस्ताने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि विद्यमान सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या मरियम नवाज यांच्यावर टीका केल्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी कॅपिटल टीव्हीवरील चर्चेच्या दरम्यान हसन यांनी जोरदार टीका केली. मरियम नवाज यांच्यावर खोचक शब्दात टीका करताना पुढे, “लाज वाटली पाहिजे तुझा बाप सुल्तान मफरुर आहे. ४ आठवडे सांगून तो ४ वर्षांपासून देशाबाहेरुन देशात आला नाही. तो संपूर्ण पाकिस्तानच्या स्वप्नांना चूना लावून पळून गेला. पाकिस्तानमधील कितीतरी मोठ्या संस्थांना चूना लावून ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आश्वास देऊन गेला आहे. त्याला या ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जामीन मंजूर करणारं कोण होतं तर शहबाज शरीफ,” अशा कोचक शब्दात हसन यांनी सुनावल.
VHP Alok Kumar : धर्मांतर करणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ देऊ नये, आरक्षणावरून नवा वाद?
इम्रान खानवर जोरदार हल्लाबोल
सुल्तान मजबूर शहबाज शरीफने जामी देताना सांगितलं होतं की मी शब्द देतो पण यांना जाऊ द्या ते ४ आठवड्यात परत येणार आहेत. बेगम सफदरच्या नशिबात केवळ इम्रान खान येतात. त्या सकाळ- संध्याकाळ इम्रान- इम्रान करत राहतात. बेगम शफदर नेहमी संगत असतात की, तुम्ही इम्रान खान, तुमचा इम्रान खान, हा इम्रान खान, तो इम्रान खान, याला पकडा, त्याला अटक करा, याला न्यायालयात खेचा. त्यांचं मन मानत नाही. त्यांचं मन (इम्रान यांच्याशिवाय) लागत नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
डाकू असल्याचा टोला
दररोज कोणाचा ना कोणाचा तरी ऑडिओ रिलीज करता. त्यामध्ये सांगता की त्यांच्याकडे जनरल फैज यांच्याविरोधामध्ये पुरावा आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की इम्रान खान यांच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत, असा इशारा हसन यांनी दिला. त्यांनी मरियम नवाज यांना डाकू असल्याचा टोला लगावला. “डाकूराणीने पाकिस्तानमध्ये नव्या प्रकारचे राजकारण सुरु केलं आहे. यामध्ये ते स्वत:ची लाज काढून घेत आहेत, स्वत: गाडल्या जात आहेत, असंही यावेळी हसन म्हणाले.
‘या’ मराठी चित्रपटांना मिळणार अनुदान, सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते वाटप
सनी लिओनीकडून…
मरियम नवाज हा नवाज शरीफ यांची मुलगी आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या असलेल्या मरियम नवाज यांनी इम्रान खान यांना चांगलेच लक्ष्य करताना त्यांनी हसन यांनी टीका करताना, इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्याकडून हिंमत उधार घेऊन संकटांचा सामना केला पाहिजे असा टोला वडिलांचा संदर्भ देत लगावला होता. या टीकेवरुनच हसन यांनी मरियम याना सुनावलं आहे.
काल बेगम सफदर यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली, त्यांनी हिंमत नवाज शरीफ यांच्याकडून उधार घेतली पाहिजे असं सांगितलं. हे म्हणजे असं सांगण्यासारखं आहे की आपली प्रतिष्ठा सनी लिओनीकडून उधार घेण्यासारखं आहे,” अशी घाणेरड्या शब्दात टीका हसन यांनी केली. यावरुन आता सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत थेट अगोदर पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव घेत टीका टीप्पणी केल्याने देशात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.