2024 मध्ये सर्व रेकॉर्ड तोडत सत्तेत येणार; विरोधकांना उत्तर देताना मोदींनी फुंकलं रणशिंग

2024 मध्ये सर्व रेकॉर्ड तोडत सत्तेत येणार; विरोधकांना उत्तर देताना मोदींनी फुंकलं रणशिंग

Parliment Session : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोडपणे प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून येत आहे. अधिवेशनात फिल्डिंग विरोधकांची पण सत्ताधाऱ्यांनी चौकार अन् षटकार मारल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संसदेत विरोधकांनी मणिपूर हिंसारावरुन सत्ताधारी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. या अविश्वाश ठरावावर मागील तीन दिवसांपासून सत्ताधारी-विरोधकांमध्ये रणधुमाळी सुरु होती. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप रेकॉर्ड मोडून पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव देवाचा आशिर्वाद :
देव दयाळू असतो, कोणाच्यातरी माध्यमातून आपल्या इच्छा पूर्ण करीत असतो. विरोधकांच्या प्रस्तावाला मी देवाचा आशिर्वाद मानतो. मी आधीही सांगितलं होतं, अविश्वास प्रस्ताव ही आमची नाहीतर विरोधकांची बहुमत चाचणी आहे. 2018 साली देखील विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. पण तेव्हाही विरोधकांकडे असलेलं मतदान त्यांना झालं नव्हतं. हा प्रस्ताव आमच्यासाठी शुभ मानतो.

फिल्डींग विरोधकांची पण बॅटिंग सत्ताधाऱ्यांची :
मी आधीही 2018 साली सांगितलं होतं, तुम्ही 2023 साली पूर्ण तयारी करुन या, पण विरोधक पूर्ण तयारी करुन येत नाहीत. त्यामुळे सभागृहात फिल्डिंग विरोधकांची होती पण बॅटिंग सत्ताधारीच करत होते. सत्ताधारी विरोधकांच्या ‘नो बॉलवर चौकार, षटकार’ मारत होते, पण विरोधक ‘नो’ बॉलच टाकत होते.

अधिवेशनात महत्वपूर्ण विधेयकं मंजूर :
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून देशातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, विरोधकांनी पहिल्या दिवसापासून महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करुन सहभाग घेतला नाही. कारण विरोधकांना देशातल्या युवकांच्या भविष्याचं नाहीतर सत्तेचं देणंघेणं आहे. पुढचा काळ माहिती आणि तंत्रज्ञानाचा असणार आहे. त्यामुळे देशातल्या युवकांना नवीन दिशा देणारं विधेयक आम्ही मंजूर केले आहेत. डेटा प्रोटेक्शन विधेयक हा महत्वपूर्ण विधेयक मंजूर केला आहे. मात्र, विरोधकांना युवकांच्या भविष्याची चिंता नाहीतर स्वत:च्या राजकारणाची चिंता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube