Petrol Diesel Price Hike : मोठा धक्का! तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर; जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price Hike :  देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात देशात तिसऱ्यांदा

Petrol Diesel Price Hike

Petrol Diesel Price Hike :  देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात देशात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. 23 मे शनिवार पासून देशात नवीन दर लागू होणार आहे. माहितीनुसार, आजपासून देशात पेट्रोलच्या दरात 91 पैशांची तर डिझेलच्या दरात 86 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

19 मे रोजी पेट्रोलचे दर 87 पैशांनी आणि डिझेलचे दर 91 पैशांनी (Petrol Diesel Price Hike) वाढवण्यात आले होते तर 15 मे रोजी दरांमध्ये 3 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली होती.

तर दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) अजूनही बंद असल्याने भारताला कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा मिळवणे शक्य होत नसल्याने इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्याने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आता 107 रुपयांपेक्षा जास्त किमतीमध्ये विकले जात आहे. तर डिझेल देखील 101 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

व्यवसायात मिळणार संधी, ‘या’ राशींच्या लोकांना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?

रशियाकडूनही कच्च्या तेलाचा पुरवठा नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला रशियाकडून (Russia) तेल खरेदी करण्यावर निर्बंध लादल्याने भारताने रशियाकडून सध्या कच्च्या तेलाची खरेदी बंद केली आहे. यामुळे भारताच्या इंधन साठ्यात मोठी घट दिसून येत आहे. 15 मे रोजी दरांमध्ये सुमारे 3 रुपयांची वाढ 15 मे 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. जी एप्रिल 2022 नंतरची पहिलीच दरवाढ ठरली. त्या दिवशी पेट्रोलच्या दरात 3.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली होती तर  19 मे रोजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. या दिवशी 87 पैशांची वाढ करण्यात आली होती.

follow us