फिल्मी स्टाईल राडा; को-पायलटचा चाकूने हल्ला, क्रॅशचा प्रयत्न…भारतीय पायलटच्या शौर्याने विमानाचं सुरक्षित लॅंडिग!
फ्लाय दुबई एअरलाईन्सच्या विमानात पायलट भिडल्यानंतर भारतीय पायलट स्मित माछऱने विमान सुरक्षित लॅंड करुन 180 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.
Smit Machchhar : दुबईहून इस्त्राईलला निघालेल्या फ्लाय दुबई एअरलाईनच्या विमानात विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली. या विमान हवेत असतानाच कॉकपेटमध्ये अचानक पायलट आणि को पायलटमध्ये तुफान वाद सुरु झाला. या वादानंतर को-पायलटकडून दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला करण्यात आला. या वादादरम्यान को-पायलटचा विमान क्रॅश करण्याचा डाव एका भारतीय पायलटने हाणून पाडला आहे. मुंबईच्या स्मित माछरने आपलं शौर्य सिद्ध करत हवेत असलेलं विमान सुरक्षितपणे लॅंडिंग करुन को-पायलटचे मनसूबे फेल ठरवले आहेत. एवढंच नाही तर विमानातील 180 प्रवाशांचे जीव वाचवून त्यांच्या स्मित माछर देवदूतच बनलायं. या घटनेनंतर जगभरात भारतीय पायलट स्मित माछरचे कौतूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्मितचे कौतूक केले आहे.
नेमकं काय घडलं?
विमान हवेत, जवळपास 180 प्रवासी आत आणि अचानक विमानातून ‘हायजॅक’चा इशारा, काही क्षणांतच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. इस्रायलने लढाऊ विमानं हवेत रवाना केली, विमानाचा मार्ग बदलला आणि अखेर त्याचं सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, काही वेळाने या थरारक घटनेमागचं कारण समोर आलं आणि सुरुवातीच्या हायजॅकच्या संशयाला वेगळंच वळण मिळालं.
त्याचं झालं असं की, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai FZ1073 या विमानाने उड्डाण केल्यानंतर सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्राजवळ असताना आधी 7700 हा सामान्य आपत्कालीन सिग्नल दिला. त्यानंतर काही मिनिटांतच 7500 हा कोड सेट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत 7500 हा कोड विमानात अनधिकृत हस्तक्षेप किंवा संभाव्य हायजॅकिंग दर्शवतो. त्यामुळे इस्रायली सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.
7500 कोड मिळताच परिस्थितीला संभाव्य सुरक्षा धोका म्हणून पाहण्यात आलं. इस्रायली हवाई दलाने विमानाच्या दिशेने फायटर जेट्स रवाना केल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी विमानाने तेल अवीवकडे जाण्याऐवजी मार्ग बदलला आणि सौदी अरेबियाच्या तबुककडे वळलं. विमानाने अखेर तबुक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती Flydubaiकडून देण्यात आली आहे.
विमानाच्या कॉकपेटमध्ये दोन्ही पायलटमध्ये वाद सुरु असतानाच एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. याचवेळी चाकुने हल्ला केलेल्या पायलटच्या डोक्यात विमान क्रॅश करण्याचा डाव सुरु होता. याचवेळी भारतीय पायलट स्मित माछऱने कॉकपेटमध्ये प्रवेश करुन विमानावर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितरित्या लॅंडिग केलं आहे.