पंतप्रधान मोदी करणार बांगलादेशाचा दौरा; तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित?
PM Modi Visit Bangladesh : भारत आणि बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तनाव वाढल्याने दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहे.
PM Modi Visit Bangladesh : भारत आणि बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तनाव वाढल्याने दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशचा दौरा करु शकतात. नुकतंच बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत बीएनपीने प्रचंड विजय मिळवला असून तारिक रहमान देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. बीएनपीने भारतासोबतच्या संबंधांमध्ये “नवीन सुरुवात” करण्याचे संकेत दिल्याने पंतप्रधान मोदी बांगलादेशात (Bangladesh) जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. मात्र यावर भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
तर दुसरीकडे बीएनपी (BNP) सर्व प्रादेशिक राष्ट्रप्रमुखांनाही आमंत्रित करू शकते. तारिक रहमान (Tarique Rahman) यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार हुमायून कबीर यांनी स्पष्ट केले की दोन्ही देशांनी त्यांच्या जुन्या धारणा बदलण्याची वेळ आली आहे.
विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, प्रस्ताव आला तर…; शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
बांगलादेशच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत बीएनपी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बीएनपीने या निवडणुकीत 211 जागांवर बाजी मारली आहे. तर भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या जमातला 70 जागा जिंकता आल्या आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत इतर पक्षांना 6 जागा जिंकत्या आल्या आहेत.
