PM Modi : श्रीराम मंदिरासाठी PM मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान; आज नाशिकच्या पंचवटीतून सुरुवात

PM Modi : श्रीराम मंदिरासाठी PM मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान; आज नाशिकच्या पंचवटीतून सुरुवात

PM Narendra Modi Nashik Visit : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस (Ram Mandir) जवळ येत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ayodhya Ram Temple) तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशवासियांना एक खास संदेश दिला. एका ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करत मोदी यांनी 11 दिवसांचे अनुष्ठान आजपासून सुरू करत असल्याचे सांगितले. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी त्यांनी दिलेल्या या संदेशाची जोरदार चर्चा होत आहे.

पंतप्रधान मोदी आपल्या संदेशात म्हणाले, की अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त 11 दिवस राहिले आहेत. माझे भाग्य आहे की या पुण्य प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व देशवासियांच्या वतीने मला प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रभूंनी मला निमित्त बनवले आहे. याचा विचार करून आजपासून मी 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला प्रारंभ करत आहे. देशवासियांनी मला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. या प्रसंगी मनातील भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. पण, मी माझ्याकडू एक प्रयत्न नक्कीच करतोय.

सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा देत मोदींनी व्हिडिओ संदेशाची सुरुवात केली. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरातील रामभक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. आज सर्वत्र श्रीराम भक्तीचे अद्भूत वातावरण आहे. प्रत्येक जण 22 जानेवारी या दिवसाची वाट पाहत आहे. अयोध्येतील रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता फक्त 11 दिवस राहिले आहेत. य शुभ सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळत आहे हे माझे भाग्य आहे, असे मोदी म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात ‘प्रभू श्रीराम’ गाणं

या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणांशी, जनतेला प्रार्थना करतोय. तु्म्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्या. माझ्याकडून कोणतीही कमी राहणार नाही. या 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात मी नाशिकधाम पंचवटीतून करत आहे, असेही मोदी म्हणाले. पंचवटीत प्रभू श्रीरामांनी बराच काळ वास्तव्य केलं होतं असेही मोदी यांनी आपल्या संदेशात सांगितले.

दरम्यान, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6 हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube