राहुल गांधींना मोठा दिलासा; 2018 च्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुलतानपूर न्यायालयाने

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Rahul Gandhi

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुलतानपूर न्यायालयाने त्यांची 2018 च्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या विधानांशी संबंधितगृ प्रकरणात राहुल गांधी यांनी निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे.

भाजप नेते विजय मिश्रा यांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवरून हा खटला सुरू झाला होता. सुरुवातीला हा खटला दिवाणी न्यायालयात होता, त्यानंतर तो खासदार-आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला. खासदार-आमदार न्यायालयाचे दंडाधिकारी शुभम वर्मा यांनी राहुल गांधी यांना निकालाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच, निकाल जाहीर होण्यापूर्वी त्यांना वैयक्तिक बंधपत्र (पर्सनल बाँड) आणि जामीन बंधपत्र (बेल बाँड) सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी न्यायालयात पोहोचल्यावर वैयक्तिक बंधपत्र सादर करून या आदेशाचे पालन केले.

प्रकरण काय?

मे 2018  मध्ये, कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी बेंगळुरूमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. आरोपानुसार, या कार्यक्रमात त्यांनी अमित शहा यांच्याबद्दल काही विधाने केली होती. अमित शहा (Amit Shah) तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आहेत. ही विधाने बदनामीकारक असल्याचा दावा करत, भाजप नेते आणि सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधींविरुद्ध याचिका दाखल केली होती.

तक्रारदाराने राहुल गांधींच्या आवाजाचा नमुना (व्हॉइस सॅम्पल) घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता मात्र, ही विनंती सत्र न्यायालयाने (ट्रायल कोर्ट) फेटाळून लावली. त्यानंतर, सत्र न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांनी तक्रारदाराची ही मागणी असलेली याचिका फेटाळून लावली.

यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही ; आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय

follow us