Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं

Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी अडनावाप्रकरणी भाष्य केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एवढचं नाहीतर त्यांची खासदाराकीही रद्द करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आज गांधींना शासकीय निवासस्थानही देण्यात आलं आहे. (After revival of MP post Rahul Gandhi got Official Home again)


राहुल गांधी खासदार असताना त्यांना 12 तुघलक लेन या ठिकाणी ते रहिवास करत असतं. आता पुन्हा एकदा खासदाराकी बहाल झाल्यानंतर त्यांना 12 तुघलक लेन इथेच शासकीय निवासस्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा त्याचं ठिकाणी वास्तव्यास येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसला संजीवनी मिळणार; महाराष्ट्रातही ‘पदयात्रा’ काढणार

पुन्हा घर मिळाल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.’संपूर्ण भारतच माझं घर आहे, या असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून आजच्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षांच्यावतीने राहुल गांधी यांच्या भाषणाने सुरुवात होणार होती, मात्र, खासदार गौरव गोगई यांनी अभिभाषण केलं आहे. अधिवेशनात आज मणिपूर घटना, अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. चर्चेदरम्यान, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

दरम्यान, खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी चांगलेच सक्रिय झाले आहेत. राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा 16 ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता या पदयात्रेला जनता कसा प्रतिसाद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube