आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला केला?, विद्यार्थ्याचं शर्ट काढून दावखवत राहुल गांधींचा सरकारवर घणाघात
राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरणावरून निशाणा साधला आहे.
दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. (Rahul Gandhi) दिल्लीत विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुणांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हला का करण्यात आला? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरणावरून निशाणा साधला आहे. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, यावेळी विद्यार्थी आणि पोलीस आमने-सामने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, यावरून देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा उद्या राजीनामा होणारच?, सीजेपीच्या दोन मागण्या मान्य
दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जोरदार आंदोलन केलं होतं. तब्बल तीन तास राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर आता काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजस्थानात वकीलांचे धरणे आंदोलन
राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठासमोर वकीलांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या विधी विभागाशी संलग्न असलेल्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या (जयपूर) वकिलांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पायी मोर्चा आयोजित केला. हा मोर्चा उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 3 पासून आंबेडकर सर्कलपर्यंत सुरू राहिला. दरम्यान, विद्यार्थी नेता शुभम रेवाड जयपूरमधील राजस्थान विद्यापीठाच्या गेटवर उपोषणाला बसला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. विद्यार्थी त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत. जयपूरच्या जवाहर सर्कल येथे जनरेशन-झेडचे सदस्यही आंदोलन करत आहेत.