तरुणांना रोजगार नाही, शेतकरी त्रस्त अन्…, अर्थसंकल्पावर नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

Rahul Gandhi On Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) 2026-27 साठी अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पावर

  • Written By: Published:
Rahul Gandhi On Budget 2026

Rahul Gandhi On Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) 2026-27 साठी अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पावर आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करत ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर आता या अर्थसंकल्पावर लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताच्या खऱ्या समस्यांबद्दल अनभिज्ञ असलेला अर्थसंकल्प असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले की, तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. उत्पादन घटत आहे. गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहेत. देशांतर्गत बचत वेगाने कमी होत आहे. शेतकरी त्रस्त आहेत. येणाऱ्या जागतिक धक्क्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सुधारणा लागू करण्यास नकार देणारा आणि भारताच्या खऱ्या समस्यांबद्दल अनभिज्ञ असलेला अर्थसंकल्प असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी अर्थसंकल्पाबद्दल निराशा व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारकडे कल्पनांचा अभाव आहे आणि अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांना तोंड देत नाही. अर्थसंकल्पात धोरणात्मक दृष्टी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. ते कोणतेही उपाय देत नाही, धोरणात्मक कमतरता लपवण्यासाठी घोषणाही देत ​​नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

मुंबई- पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार

मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून करण्यात आली आहे. याचबरोबर 7 नवीन हायस्पीड रेल्वे सुरु करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद

तर दुसरीकडे मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची देखील माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. याचा फायदा टियर 2 आणि 3 मधील शहरांना होणार आहे.

हाफ मॅरेथॉनमध्ये धावले नगरकर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद

2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे असं देखील निर्मला सीतारमण म्हणाल्या.

follow us