चार वर्षे जुन्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा ठोठावणारे प्रकरण नेमकं काय?

  • Written By: Published:
चार वर्षे जुन्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा ठोठावणारे प्रकरण नेमकं काय?

Rahul Gandhi Defamation Case :  मोदी आडनावावरून टीका करणं काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या (Rahul GAndhi) अंगलट आले आहे. गुजरात सेशन कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधींना दोषी  ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण या बातमीच्या माध्यामातून थोडक्यात जाणून घेऊया.

‘धन्य ते हास्यसम्राट’.. राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

राहुल गांधींनी 2019 मध्ये कर्नाटकातील एका रॅलीमध्ये सर्व चोरांचे नाव मोदीचं (Modi Surname) का असते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर याप्रकरणाता सुरत येथील सेशन कोर्टात मानहानीची केस दाखल करण्यात आली होती. भाजपचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री पूर्णेश मोदींनी ही केस दाखल केली होती. या सर्व प्रकणावर दोषी बाजुंची मते ऐकल्यानंतर कोर्टाने 17 मार्च रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी राहुल गांधी तीनवेळी कोर्टात हजर राहिले आहेत.

NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधींनी कार्नाटकात 13 एप्रिल 2019 रोजी एका निवडणूक रॅलीत म्हटले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? असे म्हणत सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर भाजप आमदाराने या प्रकरणी मानहीनीचा दावा दाखल केला. तसेच राहुल गांधींनी 2019 च्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना संपूर्म मोदी समुदायाला बदनाम केल्याचा आरोप केला. राहुल गांधीं विरोधात केस दाखल करणारे पूर्णेश भूपेंद्र पटेल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. तसेच ते डिसेंबरमध्ये झालेल्या निडणुकांमध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

दरम्यान, भाजप आमदाराने केलेल्या आरोप राहुल गांधींनी फेटाळून लावले होते. तसेच आपल्यावर लावलेले आरोप चुकीचे असून, रॅलीत आपण काय विधान केले होते ते आठवत नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणात कोर्टाने कार्नाटकातील कोलाचे तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषणाचे रेकॉर्डिंग करणारे निवडणूक आयोगाच्या व्हिडिओ वरून साक्ष नोंदवली होती. त्यानंतर राहुल यांची चौकशी करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube