पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह गद्दार; राहुल गांधी यांची आक्रमक टीका

लक्षात ठेवा, जसे मोदी कोविड आणि नोटाबंदीच्या वेळी 'मला फाशी द्या' असं म्हणत रडले होते, तसंच ते पुन्हा टीव्हीवर येतील.

News Photo   2026 05 20T173648.990

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह हे दोघ गद्दार असून त्यांनी देश विकला आहे असा थेट हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे. ते उत्तर प्रदेशमधील त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रायबरेली येथे बोलत होते

जेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांना उघडपणे सांगा की तुमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहेत. त्यांनी भारताला विकलं आहे. राहुल म्हणाले, “मी तुम्हाला सांगतोय, दोष पूर्णपणे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचा आहे कारण त्यांनी ते (राज्यघटना) नष्ट केली आहे. असही राहुल गांधी म्हणाले आहेत.

आता आर्थिक वादळ येत आहे. मोदी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, जसे ते कोविड आणि नोटाबंदीच्या वेळी ‘मला फाशी द्या’ असं म्हणत रडले होते, तसंच ते पुन्हा टीव्हीवर येतील. ते हात जोडून रडतील.” ते म्हणतील, “ही माझी चूक नाही.” दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल यांनी रायबरेलीला सहा वेळा भेट दिली आहे. ही त्यांची सातवी भेट आहे. यापूर्वी त्यांनी 19 जानेवारी 2026 रोजी रायबरेलीला भेट दिली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते, राहुल 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.

देशात आर्थिक वादळ पण पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटण्यात व्यस्त ; राहुल गांधी PM मोदींवर भडकले

राहुल गांधी काल 19 मे रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी, त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये कार्यकर्ते आणि रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी लोधवारी गावाला भेट दिली आणि स्वातंत्र्यसैनिकाच्या पुतळ्याचे अनावरण केले. यापूर्वी, भरतगंज बाजारात लोकांना पाहून राहुल यांनी आपला ताफा थांबवला. ते गाडीतून उतरले आणि तेथे उपस्थित असलेल्यांशी हस्तांदोलन केले. त्यांनी गुलाब आणि फुलांचा गुच्छ घेतला आणि नंतर लोधवारी गावाकडे प्रस्थान केलं.

राहुल गांधी अमेठीलाही भेट देणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी स्थानिक खासदार के. एल. शर्मा यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले. त्यावर लिहिले आहे, “किशोरी लाल, दोन वर्षे. तुम्ही काय केले? काँग्रेस नेत्याच्या शाळेसाठी एक बस. तुमच्या ट्रस्टच्या रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका.” या पोस्टरमध्ये अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी दिली आहे.

Tags

follow us