काँग्रेसला राज्यसभेत झटका, Rajni Patil निलंबित

काँग्रेसला राज्यसभेत झटका, Rajni Patil निलंबित

नवी दिल्ली : सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण केल्याबद्दल राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ (Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhar) यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) उर्वरित कामकाजासाठी निलंबित केले.

जगदीप धनखड़ म्हणाले, “या सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित एक व्हिडिओ आज सार्वजनिक डोमेनवर ट्विटरवर प्रसारित करण्यात आला. मी ते गांभीर्याने घेतले आणि आवश्यक ते केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला होता. विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ चित्रित केरून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी रजनीताई पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन करण्याची सत्ताधारी पक्षाने मागणी केली होती.

राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत आणि वारंवार इशारे देऊनही असे प्रकार घडत असल्याबद्दल तातडीने कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली होती. त्यानंतर रजनीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रजनीताई पाटील म्हणाल्या, “स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून मी येते आहे. मला या अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा. परंतु ज्या पद्धतीने भाजपने नाव घेऊन सभागृहात अपमान केला आहे तो सहन करणार नाही, असे रजनीताई पाटील यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube