UPI चे नियम बदलले! खात्यातून पैसे कट होण्यापूर्वी आता येणार मेसेज; वाचा काय काय बदललं…

RBI Auto Debit New Rules ओटीटी सबस्क्रिप्शनपासून ते गृहकर्जाच्या ईएमआयपर्यंत, प्रत्येक ऑटो-डेबिट व्यवहारासाठी आता नवे नियम लागू झाले आहेत.

  • Written By: Published:
UPI चे नियम बदलले! खात्यातून पैसे कट होण्यापूर्वी आता येणार मेसेज; वाचा काय काय बदललं...

RBI Auto Debit New Rules : दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून जर OTT सबस्क्रिप्शन, वीज बिल, विमा हप्ते किंवा SIP सारखे पेमेंट  ऑटो-डेबिटद्वारे कापली जात असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण RBI ई-मँडेट्स म्हणजेच रिकरिंग पेमेंट सिस्टम संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. त्याअंतर्गत आता 15,000 पेक्षा जास्त रकमेच्या ऑटो-पेमेंटसाठी एक्स्ट्रा सिक्योरिटी लेयर म्हणजेच अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA) अनिवार्य करण्यात आले आहे. नेमकं RBI ने कोण कोणते नियम बदलले त्याबद्दल जाणून घेऊया..

Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

15000 ची मर्यादा आणि OTP चा नियम

RBI च्या नवीन नियमांनुसार जर तुमचे ऑटो-पेमेंट 15000 पर्यंत असेल, तर ते पूर्वीप्रमाणेच OTP शिवाय पार पडतील. मात्र, जर व्यवहार 15000 च्या वर असेल तर, बँक तुम्हाला ‘अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’ (AFA) अंतर्गत ओटीपी किंवा अतिरिक्त पडताळणी मागेल. यामुळे मोठ्या रकमांच्या व्यवहारांना सुरक्षेचा एक जास्तीचा स्तर मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्या पेमेंट्सवर लागू होणार नियम ?

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, 15 हजारापर्यंतची छोटी देयके आता ओटीपीशिवाय आपोआप केली जातील. मात्र, एकदा व्यवहार या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास बँक तुम्हाला पुन्हा पडताळणी करण्यास सांगेल. हे नियम यूपीआय ऑटो-पे, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड वॉलेट्सना लागू असतील आणि त्यांची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.

शाळांची ‘दुकानदारी’ बंद! गणवेश, वह्या-पुस्तके आता कोठूनही खरेदी करता येणार; परिपत्रक निघालं

विमा आणि SIP साठी 1 लाखांपर्यंत सवलत

नव्या नियमांमध्ये आरबीआयने काही महत्त्वाच्या पेमेंटबाबत दिलासा दिला आहे. यामध्ये विमा हप्ता (Insurance Premium), म्युच्युअल फंड (SIP) आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी 15000 ते 1 लाख पर्यंतचे व्यवहार काही अटींसह ओटीपीशिवाय पूर्ण होऊ शकतील.

ई-मँडेटसाठीवन-टाइम ऑथेंटिकेशन गरजेचे

डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आरबीआयने ई-मँडेट प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता कोणतीही ऑटो-पेमेंट सेवा किंवा ई-मँडेट सुरू करताना ग्राहकांना प्रथम Extra Authentication करणे बंधनकारक असेल. जोपर्यंत तुमची अधिकृत पडताळणी (Verification) पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे मँडेट सक्रिय केले जाणार नाही. विशेष म्हणजे, मँडेट सेट केल्यानंतर होणारा पहिला व्यवहारही ऑथेंटिकेशननंतरच पूर्ण होईल. या दुहेरी सुरक्षा स्तरामुळे तुमचे रिकरिंग पेमेंट्स अधिक सुरक्षित होतील आणि अनधिकृत व्यवहारांना चाप बसेल.

MSME Credit Card : झटपट पटापट, आता 30 दिवसांच्या व्याज माफीसह मिळणार 5 लाखांचं कर्ज

पैसे कापण्यापूर्वी 24 तास आधी मिळणार अलर्ट

फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने एक सूचना प्रणाली अनिवार्य केली आहे. त्यानुसार आता तुम्हाला कोणत्याही रिकरिंग पेमेंटच्या किमान 24 तास आधी एक नोटिफिकेशन मिळेल. या अलर्टमध्ये दुकानदाराचे किंवा व्यापाऱ्याचे नाव, पेमेंटची रक्कम आणि डेबिटची तारीख स्पष्टपणे नमूद केलेली असेल. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला ते पेमेंट करायचे नसेल, तर तुमच्याकडे ते रद्द करण्याचा अधिकार असेल.

पेमेंट केल्यानंतरही मिळणार कन्फर्मेशन अलर्ट

तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा झाल्यानंतरही तुम्हाला लगेच अलर्ट पाठवला जाईल. या मेसेजमध्ये केवळ व्यवहार यशस्वी झाल्याची माहितीच नसेल, तर एखादा चुकीचा व्यवहार झाल्यास तक्रार कशी नोंदवायची, याची सविस्तर माहितीदेखील समाविष्ट असेल. यामुळे ग्राहकांना आपल्या प्रत्येक ‘ऑटो डेबिट’ व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवता येईल

यूजर्स स्वतः सेट करू शकणार ई-मँडेट

आरबीआयच्या नवीन नियमांमध्ये यूजर सोयीनुसार फिक्स्ड अमाऊंट मॅंडेट आणि  व्हेरिएबल मँडेट असे दोन्ही पर्याय निवडू शकणार. इतकेच नाही, तर ई-मँडेटची रक्कम, तारीख किंवा वैधता यामध्ये कोणताही बदल केल्यास पुन्हा ऑथेंटिकेशन करणे आवश्यक असेल. विशेष म्हणजे, यूजर कधीही हे मँडेट बदलू किंवा रद्द करू शकतील.

कार्ड बदलले तरी पेमेंट थांबणार नाही

अनेकदा तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड एक्स्पायर होते किंवा हरवल्यामुळे तुम्ही नवीन कार्ड घेता. अशा वेळी जुन्या कार्डवर सेट केलेले तुमचे ऑटो-डेबिट नवीन कार्डवर आपोआप ट्रान्सफर होतील. तुम्हाला पुन्हा प्रत्येक गोष्टीसाठी मँडेट सेट करण्याची गरज भासणार नाही.

follow us