धक्कादायक! सीबीएसई 12 वी प्रश्नपत्रिकेत थेट युट्युब व्हिडीओचा क्यूआर, नेमकं काय घडलं?

CBSE question paper च्या प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर एक युट्युब लिंक ओपन होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

CBSE Question Paper

Shocking! QR of YouTube video directly in CBSE 12th question paper, what exactly happened : केंद्रिय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा शेवटच्या टप्प्यात आहेत. तर 6 देशांमध्ये मध्य पुर्वेतील युद्धामुळे परीक्षा लांबवण्यात आल्या आहेत. या दरम्यान 9 मार्चला देशभरामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या पेपरचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र घरी आल्यानंतर या प्रश्नपत्रिकेने विद्यार्थ्यांची काळजी वाढवली. कारण या प्रश्नपत्रिकेवर देण्यात आलेल्या क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर एक युट्युब लिंक ओपन होत आहे. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका बनावट असल्याची चिंता व्यक्त केली जात असून यावर सीबीएसईने स्पष्टीकरण दिलं आहे.

या प्रकरणावर सीबीएससी ने नेमकं काय म्हटलं?

या क्यूआर कोडच्या प्रश्नपत्रिकेवर स्पष्टीकरण देताना सीबीएसईने म्हटलं की, परीक्षा बोर्डच्या प्रश्नपत्रिकेवर काही सिक्युरिटी फीचर्स दिले जातात. ज्यामध्ये क्यूआर कोडचा देखील समावेश आहे. सिक्युरिटी ब्रिज च्या संशयामध्ये किंवा क्यूआर कोडमुळे प्रश्नपत्रिका खरी आहे की बनावट आहे. याची खात्री केली जाते. मात्र जेव्हा गणिताची प्रश्नपत्रिका पाहिली. त्यावेळी हा क्यूआर कोड थेट एका युट्युब व्हिडिओच्या लिंकचा आहे.

Crude Oil : इजिप्तच्या ममी ते तुमच्या कारची टाकी : कच्च्या तेलाचा ५००० वर्षांचा रंजक इतिहास!

त्यामुळे सीबीएससी ने सांगितलं की, क्यूआर कोड जरी youtube च्या व्हिडिओचा असला तरी देखील ही प्रश्नपत्रिका खरी आहे. प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आलं आहे. तसेच भविष्यात अशाप्रकारे गैरप्रकार होऊ नये. याची देखील काळजी बोर्डाकडून घेतली जाईल. असा विश्वास विद्यार्थ्यांनी पालकांना देण्यात आला आहे.

follow us