E20 पेट्रोलवरून नवा वाद, SIAM च्या अहवालात इंजिन खराब होण्याचा दावा; सरकारची प्रतिक्रिया काय?
SIAM On E20 Petrol : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोल चर्चेत असून या पेट्रोलबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात
SIAM On E20 Petrol : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोल चर्चेत असून या पेट्रोलबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत असल्याने विरोधक देखील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता या पेट्रोलबाबत वाहन उत्पादक कंपन्यांची सर्वोच्च संस्था सियामने मोठा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सियामने केलेल्या दाव्यानुसार या पेट्रोलमुळे इंजिन आणि एक्झॉस्ट सिस्टम खराब होण्याची शक्यता आहे. मात्र हे दावे असलेला अहवालनंतर मागे घेण्यात आला आहे.
E20 पेट्रोलवरून नवा वाद का?
सियामने (Society of Indian Automobile Manufacturers) E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे चिंता व्यक्त केली होती. पेट्रोलच्या खराब गुणवत्तेमुळे इंजिन आणि सिस्टमचे विविध पार्ट खराब होत असल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला होता. या दाव्यावर उत्तर देताना पेट्रोलच्या गुणवत्तेवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि भेसळयुक्त पेट्रोलची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
E20 पेट्रोलबद्दल अहवालात काय ?
CNBC TV-18 च्या अहवालानुसार, SIAM ने मंत्रालयाला कळवले की E20 पेट्रोलमधील क्लोराईड आणि ओलाव्याचे (moisture) प्रमाण जास्त असल्याने फ्युएल इंजेक्टर्स, फ्युएल पंप्स, एक्झॉस्ट सिस्टम्स आणि इंजिनचे इतर पार्ट खराब होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. प्रत्यक्ष वापरादरम्यानच्या चाचण्यांमध्ये (field tests) क्लोराईडमुळे गंज लागणे आणि पार्टची असामान्य झीज होणे यांसारख्या समस्याही दिसून आल्या. E20 पेट्रोलच्या वापरास सुरुवात झाल्यानंतर क्लोराईडशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. क्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास इंजिन आणि एक्झॉस्ट सिस्टममध्ये गंज लागू शकतो, ज्यामुळे वाहन अचानक बंद पडणे किंवा दीर्घकालीन तांत्रिक समस्या निर्माण होणे असे प्रकार घडू शकतात, असा दावा त्यात करण्यात आला होता.
इंधनाच्या नमुन्यांमध्ये काय आढळले?
अहवालानुसार, काही वाहनांच्या पेट्रोल टाक्यांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये क्लोराईडचे प्रमाण 500 मिग्रॅ/किग्रॅ (mg/kg) पर्यंत आढळले, तर काही पेट्रोल पंपांवरून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये हे प्रमाण 350 मिग्रॅ/किग्रॅ पर्यंत असल्याचे दिसून आले. SIAM ने सरकारला विनंती केली की, ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’च्या (BIS) इंधन मानकांमध्ये क्लोराईडच्या प्रमाणाची कमाल मर्यादा निश्चित करावी. या संस्थेने E20 आणि E85 इंधनांमधील एकूण क्लोराईडचे प्रमाण 1 मिग्रॅ/किग्रॅ पेक्षा कमी ठेवण्याची शिफारस केली.
Certain media reports have cited issues of fuel adulteration or contamination.
It is hereby clarified that fuel quality is monitored on a regular basis by Oil Marketing Companies. In addition to the advanced and elaborate testing protocols already in place, further checks have… pic.twitter.com/o0fnrnXrCM
— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) August 4, 2026
सरकारचे म्हणणे काय?
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की तेल विपणन कंपन्या देशभरात इंधनाची नियमित तपासणी करतात. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 87000 हून अधिक पेट्रोल पंपांवर दिवसातून 8 ते 12 वेळा पाण्यात होणाऱ्या भेसळीची तपासणी केली जाते. सरकारचा दावा आहे की देशभरातून गोळा केलेल्या 2000 हून अधिक नमुन्यांपैकी केवळ दोन ठिकाणी क्लोराईड आढळले आणि त्या विशिष्ट पेट्रोल पंपांवरील इंधन विक्री त्वरित थांबवण्यात आली.
SIAM ने नंतर काय स्पष्टीकरण दिले?
E20 पेट्रोलबाबतचा वाद वाढल्यानंतर, SIAM ने स्पष्ट केले की अहवालात सादर केलेली आकडेवारी अंतिम किंवा प्रमाणित मानली जाऊ नये. संघटनेने सांगितले की, सध्या तरी सामान्य वाहन मालकांनी काळजी करण्याची गरज नाही.
संजय शिरसाटांचे मंत्रिपद धोक्यात? ‘त्या’ भेटीनंतर भाजपसह एकनाथ शिंदेही नाराज
SIAM नुसार, तेल विपणन कंपन्या 150 हून अधिक विविध निकषांवर इंधनाची चाचणी करतात. शिवाय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलमधील क्लोराईड आणि सल्फरच्या प्रमाणासाठी ३ ppm ची मर्यादा आधीच लागू केली आहे.