ब्रेकिंग : डी. के. शिवकुमार यांना साथ द्या; ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये सिद्धरामय्या यांची राजीनाम्याची घोषणा

सिद्धरामय्या यांनी सकाळी साडेदहा वाजता नाश्त्याच्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली

  • Written By: Published:
ब्रेकिंग : डी के शीवकुमार यांना साथ द्या; ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये सिद्धरामय्या यांची राजीनाम्याची घोषणा

Karnataka CM Siddharamaiah Announces Resignation :  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्र्यांसोबतच्या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये  राजीनाम्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी पुढचे मुख्यमंत्री  डी. के. शीवकुमार असतील त्यांना साथ देण्यासही सांगितले आहे. पण, शीवकुमार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होती याबाबतअद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा करताच डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेले डी.के. शिवकुमार महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार कसे ठरले?

दुपारी तीन वाजता घेणार राज्यपालांची भेट

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या बंगळूरुमध्ये असल्याने, सिद्धरामय्या दुपारी 3 वाजता राज्यपाल कार्यालयात आपला राजीनामा सादर करण्यासाठी लोकभवनाकडे रवाना होतील असे सांगितले जात आहे. कर्नाटक काँग्रेसचे कार्यकर्ते उमा शंकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “डी. के. शिवकुमार उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि आम्ही तो सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करू.”

काय म्हणाले सिद्धरामय्या

मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “राहुल गांधी जे सांगतील, मी तेच करीन.” यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, एका नव्या चेहऱ्यासाठी मला मार्ग मोकळा करण्यास मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींचा सल्ला स्वीकारून राजीनामा देत आहे. या बैठकीत सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री असतील असे सांगत सर्वांना त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

शीवकुमार देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक

विशेष म्हणजे, डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. 2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 1,413 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये स्थावर मालमत्ता, व्यावसायिक गुंतवणूक, कृषी जमीन, आलिशान मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यामुळेच कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांना केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत प्रभावशाली नेता मानलं जातं. राजकीय व्यवस्थापनासोबतच संसाधन उभारणी आणि संघटन सांभाळण्यामध्येही त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.

सर्व 140 आमदार माझे! कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाचा संघर्ष पेटला, शिवकुमार काय म्हणाले?

23 मे 2023 रोजी झाले होते मुख्यमंत्री

2023 मध्ये कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. 23 मे रोजी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, डीके यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी अडीच वर्षांच्या कार्यकाळाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. म्हणजेच, सिद्धरामय्या पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील आणि डीके शिवकुमार उर्वरित अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील. मात्र, तीन वर्षे सत्तेत राहूनही सत्तांतर झाले नाही. याच मुद्द्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या गटांमध्ये फूट पडली.

 

follow us