Bihar Politics : शिवसेनेनंतर जनता दलातही फूट! भाजप बिहारमध्ये नितीश कुमारांनाही धक्का देणार ?

  • Written By: Published:
'लोकसभे'साठी नितीश कुमारांचा नवा 'डाव'; राष्ट्रीय कार्यकारिणीत 'या' खास शिलेदारांची एन्ट्री!

महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाल्यांनतर आता बिहारमध्येही मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटले आहेत. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडली आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. उपेंद्र कुशवाह यांनी बंडखोरी करत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कुशवाह यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी आजपासून नव्याने सुरुवात करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, ते ‘राष्ट्रीय लोक जनता दल’ हा नवा पक्ष काढणार असून निवडून आलेल्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

कुशवाह म्हणाले की, बिहारच्या जनतेने राज्य चालवण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्यावर सोपवली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यामुळे नितीशकुमार पक्षाचे प्रमुख झाले. तेव्हा बिहारची जनता अडचणीत होती. बिहारच्या लोकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही 10-12 वर्षे संघर्ष केला. बिहारला या भीषण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली.

कुशवाह यांनी पुढे नितीश कुमार यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नितीशजींनी त्यावेळी खूप चांगले काम केले होते, पण “अंत भला तो सब भला” पण त्याचा शेवट चांगला झाला नाही. नितीश कुमार यांनी सुरुवातीला चांगले केले पण शेवटी त्यांनी ज्या मार्गाने चालणे सुरू केले ते त्यांच्यासाठी आणि बिहारसाठी वाईट आहे. यावेळी कुशवाह यांनी आपल्या पदाचा राजीनामाही जाहीर केला आहे.

 

Tags

follow us