काय पाणीपुरीत हाडूक! चवीच्या नादात महिलेने चावलं असतं ‘हाड’; पाहा व्हायरल व्हिडिओ

Bone Piece Found In Panipuri सहकुटुंब पाणीपुरी खायला गेलेल्या महिलेला आधी त्यात केस सापडला. तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं पण...

  • Written By: Published:
काय पाणीपुरीत हाडूक! चवीच्या नादात महिलेने चावलं असतं 'हाड'; पाहा व्हायरल व्हिडिओ

Bone Piece Found In Panipuri Plate : पाणीपुरीचं नाव काढलं की जिभेला पाणी सुटत नाही असा माणूस विरळाच. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहून तुमची ही ‘फेव्हरेट’ डिश खाताना तुम्ही दहावेळा विचार कराल. कारण, एका महिलेच्या पाणीपुरी खाताना चक्क हाड सापडलं आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही किळसवाणा प्रकार गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे.

नेमकं काय घडलं?

अहमदाबादच्या रानीप भागात एक महिला आपल्या कुटुंबासोबत ‘कृष्णा भेल पकौडी’ या गाडीवर पाणीपुरी खायला गेली होती. आधी तर तिच्या पाणीपुरीत एक केस निघाला, पण तिने ते मनावर घेतलं नाही. खरी खळबळ तेव्हा उडाली, जेव्हा तिने शेवटची पाणीपुरी खाल्ली. त्या पाणीपुरीत तिला चक्क एक हाडाचा तुकडा सापडला.

हाड सापडल्यानंतर दुकानदाराचा अजब दावा

जेव्हा त्या महिलेने दुकानदाराला जाब विचारला, तेव्हा सुरुवातीला त्याने पाणी पुरीत सापडलेला तुकडा हाड नसून लाकडाचा तुकडा असल्याचा अजब दावा केला. एवढेच काय तर या पठ्ठ्याने तो तुकडा चाकूने कापायचाही प्रयत्न केला, पण तो इतका कडक होता की, कापलाच गेला नाही. शेवटी इतर ग्राहकांनीही ते हाडच असल्याचं सांगितल्यावर दुकानदाराने माफी मागत “कुठून तरी उडून आलं असेल,” असा अजब बचाव केला.

प्रशासनाचा ‘ऑन द स्पॉट’ दणका

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि अहमदाबाद महानगरपालिकेच्या अन्न विभागापर्यंत पोहोचताच त्यांनी रात्रीत ॲक्शन मोडमध्ये येत संबंधित पाणीपुरीची गाडी त्वरित जप्त करत गाडी मालक दिनेश तेलीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

पाणीपुरी प्रेमींनो, डोळे उघडे ठेवा

सध्या हाड सापडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणा व्हायरल होत आहे. अनेक यूजर्यनी या घटनेवर संतापही व्यक्त केला आहे. त्यामुळे मित्रांनो, बाहेरचं खाताना चवीसोबत स्वच्छतेकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचे गुजरातमधील या घटनेनं अधोरेखित केलं आहे. तसेच स्ट्रीट फूडच्या क्वालिटीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी तुमची आवडती पाणीपुरी खाताना ती बनवणारा हात स्वच्छ आहे का आणि प्लेटमध्ये काय येतंय, याकडे एकदा नजर नक्की टाका आणि निरोगी रहा…

follow us