पप्पा-मम्मी सॉरी, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा शकले नाही.
हे वाक्य मीडियाच्या हेडींगमध्ये, लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई-वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात. पण हा प्रश्न अजून संपत नाही. गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याचे अनेक प्रसंग पाहायला ऐकायला मिळतात, तशीच याची अनेक कारणेही आहेत.
राजस्थानमधील कोटा हे देशातील कोचिंग सेंटरचे हब मानले जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटी – मेडिकलची तयारी करण्यासाठी जातात. पण हेच कोटा गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक आत्महत्या होणार शहर ठरत आहे.
खातेधारकांना फसवा ठरवण्यापूर्वी बँकांनी त्यांची बाजू ऐकली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
याच वर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. २०२२ मध्ये कोटा शहरात चार विध्यार्थ्यानी आत्महत्या केल्या होत्या. याच्याआधी २०१९ ते २०२२ या चार वर्षात तब्बल ५४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
राजस्थान विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना कोचिंग सेंटरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षामध्ये मागे पडणे, पालकांच्या अपेक्षा, शारीरिक, मानसिक ताण ही मुख्य कारणे सरकारने आत्महत्येमागची कारणे नमूद करताना सांगितली. याशिवाय अभ्यासातील अडचणी, आर्थिक समस्या, ब्लॅकमेलिंग आणि प्रेमप्रकरणे याही कारणांची यादी सरकारकडून सांगण्यात आली.
या दरम्यान गेल्या काही काळात फक्त परीक्षाची तयारी करतानाच नाही तर नंतर ऍडमिशन झाल्यानंतरही आत्महत्या वाढल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षात याच्या अनेक बातम्या आपण वाचत आहोत.
मागील आठवड्यात शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत सांगितले की, 2018 पासून देशभरातील विविध आयआयटी मध्ये 33 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
या सरकारी आकडेवारीमध्ये देशातील तीन संस्थांचा समावेश आहे ज्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. बहुतांश आत्महत्या या आयआयटीमधील आहेत. याच आकडेवारीनुसार एका महिन्यात IIT-बॉम्बे आणि IIT-मद्रासमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
Corona Update : देशात पुन्हा कोरोनाची दहशत; सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार पार
काँग्रेसचे खासदार एल. हनुमंतय्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की सरकारने शैक्षणिक तणाव, कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणे, मानसिक समस्या अशी मृत्यूची कारणे सांगितली आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये 4.5 टक्के वाढ झाली आहे. साधारणपणे कोरोना महामारीमुळे सुरु झालेल्या अनेक प्रश्नांमुळे आणि मानसिक तणावामुळे यात वाढ झाल्याचं सांगितलं जात. 2023 च्या पहिल्या तीन महिन्यात IIT मध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
एकदंरीत मागील काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा मोठा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. राजस्थान सरकार यावर उपाययोजना म्हणून नवा कायदा आणण्याचा विचार करत आहे. पण वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि गेल्या काही वर्षात वाढत चाललेल्या मानसिक समस्या यातून हे प्रमाण वाढत चाललं आहे.
याच एक उदाहरण म्हणजे गाझियायाबाद मध्ये आत्महत्या केलेल्या एका विद्यार्थिनीने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहले होते की, “मी अनेकांना नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली, पण स्वत:साठी ते करू शकले नाही. मी स्वतःचा तिरस्कार करू लागले आहे आणि मला स्वतःला मारायचे आहे. मला माफ करा. स्वतःचा द्वेष सर्वाधिक वेदनादायक आहे.”
Tunisia Coast Boat : ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली, 28 प्रवाशांचा मृत्यू; 60 हून अधिक बेपत्ता