वस्तुंप्रमाणे अवघ्या काही मिनिटांत हाडंही चिटकवता येणार! चीनने बनवलं हाडांचं फेविक्विक…

Chinese Scientists एक नामी संशोधन केलं आहे. त्यामुळे आता तुटलेली हाडं अवघ्या काही मिनिटांमध्ये जुळवता येणार आहेत. असा दावा करण्यात आला आहे.

Chinese Scientists

Chinese Scientists develop bone glue to fix fractures with in three minutes : तुटलेलं हाडं न जुळणे आणि त्यातून कायमचं अपंगत्व येणे ही समस्या अनेकांनी त्रस्त करते. मात्र यावर चीनी शास्त्रज्ञांनी एक नामी संशोधन केलं आहे. त्यामुळे आता तुटलेली हाडं अवघ्या काही मिनिटांमध्ये जुळवता येणार आहेत. असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.

चीनने बनवलं हाडांचं फेविक्विक…

जगभरामध्ये कोरोना हा महासाथीचा आजार ज्या चीनमधून आल्याचा दावा केला जातो. त्या चीन या देशांमध्ये शास्त्रज्ञांकडून विविध क्लुप्त्या वापरून दैनंदिन जीवनासह गंभीर समस्यांवर देखील उपाय शोधले जातात. अनेका चीनमधील लोकांची चिकित्सकवृत्ती समोर येत असते. त्यात आता चीनमधील शास्त्रज्ञांनी एक नामी संशोधन केलं आहे. त्यामुळे आता तुटलेली हाडं अवघ्या काही मिनिटांमध्ये जुळवता येणार आहेत. असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.

शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू : अच्युत गोडबोले

चीनमधील लोकल मिडिया झेजियांग ऑनलाईनने याबाबत वृत्त दिले आहे की, चीनमधील शास्त्रज्ञांनी एक मेडिकल बोन ग्लू विकसित केला आहे. त्याद्वारे केवळ 3 मिनिटांमध्ये तुटलेली हाडं जुळवता येणार आहेत. अशाप्रकारे हाडं जुळवली जावीत यासाठी जगभरात संशोधन केलं जात होतं मात्र चीनी शास्त्रज्ञांनी त्यात आघाडी घेतली आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार या ग्लूचं चीनच्या झेजियांग प्रांतात अनावरण केलं गेलं त्याला त्यांनी बोन 02 असं नाव दिलं आहे. याबाबत सर रन रन शॉ हॉस्पिटलमधील प्रमुख आणि सहयोगी मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन लिन झेयांगफेन यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना या मेडिकल बोन ग्लूबाबत माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वक्फ स्थापनेसाठी ५ वर्षे इस्लामचे पालन करणे आवश्यक नाही

follow us

संबंधित बातम्या