Political Crisis: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा उद्या महत्वाचा निकाल

  • Written By: Published:
Eknath Uddhav

नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची (Political Crisis) सुनावणी गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे.

शिंदे-ठाकरे प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे.

हे देखील वाचा
Sushma Andhare : 18 वर्षांपूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला.

दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याचा निर्णय सुप्रीम कोर्ट उद्या घेणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube