मोदींच्या भाषणात अडथळा आणला; लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निलंबित

मोदींच्या भाषणात अडथळा आणला; लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निलंबित

Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरच्या मुद्द्यावरून गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासांहून अधिक काळ भाषण करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, चौधरी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. दरम्यान, सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Suspension of Congress MP Adhir Ranjan Chaudhary)

अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असा प्रस्ताव मांडला की, “या सभागृहात अधीर रंजन चौधरी यांनी जाणीवपूर्वक व वारंवार गैरवर्तन करून सभागृहाचा अवमान केला आहे. अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देशाची आणि सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही. आता त्यांच्या गैरवर्तनाचे प्रकरण अध्यक्षांच्या अधिकाराने समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहाची विशेषाधिकार समिती याची चौकशी करेल आणि त्यानंतर समिती अहवाल येईल. हा अहवाल सादर करेपर्यंत चौधरी यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे. दरम्यान, हा निलंबणाच्या कारवाईचा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

मणिपूरमधील सद्यस्थिती नेहरु अन् काँग्रेसमुळेच! नॉर्थ ईस्ट आमच्या काळजाचा तुकडा : PM मोदींची टीका 

काय म्हणाले होते चौधरी?
गुरुवारी संसदेत अविश्वास ठरावावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या विधानामुळे संसदेत गदारोळ झाला. मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, धृतराष्ट्र आंधळा होता, आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये काही फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधी दिली नाही.

दरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2018 मध्ये सभागृह नेता या नात्याने मी त्यांच्यावर 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची जबाबदारी सोपवली होती आता मी त्यांला 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काम सोपवत आहे. पण किमान तयारी करून या, असं मोदी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube