ब्रेकिंग : अभिनेत्री त्रिशावरील डबल मिनिंग विधान भोवलं; तामिळनाडूचे माजी DCM उदयनिधी स्टॅलिन यांना अटक

Udayanidhi Stalin तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्रीवर डबल मिनिंग विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहेय 

  • Written By: Published:
Udayanidhi Stalin

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्री त्रिशावर डबल मिनिंग विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मी काहीही चुकीचं बोललो नाही. विजय यांच्याशिवाय मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असून, याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयच देईल, अशी प्रतिक्रिया अटकेनंतर उदयनिधी यांनी दिली आहे. उदयनिधी स्टालिन यांच्या अटकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी तंजावर येथे डीएमकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. भाषण करताना उदयनिधी म्हणाले होते, “जून महिना संपला, जुलै गेला आणि आता ऑगस्ट सुरू झाला आहे; तरीही पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना याचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त डीएमकेवर खोटे गुन्हे कसे दाखल करायचे याचीच चिंता आहे. कुठे पाणी येवो अथवा न येवो, तिथे ‘पाणी’ (तमिळमध्ये दारू/पेयालाही पाणी म्हटले जाते) नक्की आले पाहिजे… मी कावेरीच्या पाण्याबद्दल बोललो!” . याच भाषणात उदयनिधी स्टॅलिन यांनी सीएम विजय यांची मैत्रिण, अभिनेत्री त्रिशा हिच्यावर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यानंतर मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम (TVK) पक्षाने पोलिसांकडे तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.

 

follow us