तामिळनाडूत ट्विस्ट! CM चा मुलगा उदयनिधी उपमुख्यमंत्री; तुरुंगातून आलेला नेता थेट मंत्री
Udayanidhi Stalin Deputy CM : तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी (Tamil Nadu Politics) समोर आली आहे. येथील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे (MK Stalin) पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची (Udayanidhi Stalin) संधी मिळाली आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा असलेल्या तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मोठा निर्णय घेत मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री केलं. उदयनिधी सध्या तामिळनाडू सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांना प्रमोशन मिळालं असून सरकारमध्ये दोन नंबरचं पद मिळालं आहे. आज दुपारी साडेतीन वाजता उदयनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याकडे शिफारस केली होती की उदयनिधी यांनी त्यांच्या सध्याच्या खात्यांशिवाय योजना आणि विकास मंत्रालयही देण्यात यावं तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीही बनवण्यात यावं.
जामीनावर असलेल्या नेत्याला मंत्रिपद
राज्यपालांनी राज्य सरकारमधील या फेरबदलाला मंजुरी दिली. यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन राज्याचे उपमु्ख्यमंत्री झाले आहेत. सेंथिल बालाजी यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आले आहे. सेंथिल यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. डेअरी विकास विभाग सांभाळणाऱ्या एम. थंगराज सहीत अन्य तीन मंत्र्यांना कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
उद्योग विभागात भ्रष्टाचार, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात अन् तामिळनाडूत; काँग्रेस नेत्याचा संताप
सेंथिल बालाजी यांच्या व्यतिरिक्त डॉ. गोवी चेझियान, आर.राजेंद्रन, एस. एम. नासर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. कथित नोकरी घोटाळ्यात सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजभवनातील एका निवेदनानुसार मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याकडे शिफारस केली होती की उदयनिधी यांनी त्यांच्या सध्याच्या खात्यांशिवाय योजना आणि विकास मंत्रालयही देण्यात यावं तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीही बनवण्यात यावं.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन सतत आजारी असतात. त्यामुळे राज्य कारभारात त्यांचा हस्तक्षेप कमी झाला आहे. मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना लवकरात लवकर राज्य आणि पक्षाची कमान हाती देण्याचा प्रयत्न एमके स्टॅलिन अनेक दिवसांपासून करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच त्यांनी मुलाला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
गुजरातमध्ये पावसाचं थैमान! 30 जणांचा मृत्यू, 17 हजार लोकांचे रेस्क्यू; हवामान विभागाचा इशारा