कौतुकास्पद! तमिळनाडूमध्ये अवयवदात्यांना हुत्माम्यांचा दर्जा; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
MK Stalin On organ donation : गेल्या काही महिन्यांत भारतासह जगभरात अवयवदानात (organ donation ) मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता राज्यात अवयवदानाला प्राधान्य देण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी मोठी घोषणा केली आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केली जातील, अशी घोषणा त्यांनी केली. इतरांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने कोणीही आपले अवयव दान करेल, त्यांचे योगदान त्याग मानले जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडू सरकारने (Tamil Nadu Govt) हा निर्णय घेतला आहे.
https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE
तामिळनाडूमध्ये 2008 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी ‘अवयवदन दिवस’ साजरा केला जातो. यावेळी बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही मोठी घोषणा केली. राज्यातील अवयवदात्यांवर राज्य सरकार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार करेल. अवयवदान करून एखाद्याचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तींना हा राज्य सन्मान देण्यात येणार असल्य़ाचं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले भारतात अवयवदानाचं प्रमाण कमी आहे. प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेत 26 अवयवांचं दान केलं जातं. त्या तुलनेत भारतात हे प्रमाण फारच कमी आहे. त्यासाटी सर्व लोकांनी केवळ त्यांचे अवयव दान करून थांबता कामा नये, तर प्रत्यारोपनासाठी अवयवांची जी कमतरता आहे, ती लक्षात घेऊन अवयवदानाबद्दल जनजागृती करावी, अशी आग्रही विनंती स्टॅलिन यांनी केली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याबद्दल राज्यातील विरोधी पक्षांनीही सरकारचे अभिनंदन केले.
आतापर्यंत 6000 हून अधिक अवयवदान
2008 मध्ये राज्यात अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली तेव्हा 17 शेहून अधिक जण अवयव दानासाठी पुढे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 6000 हून अधिक रुग्णांचे अवयवदान करण्यात आले आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, आतडे, कॉर्निया, हाडे, त्वचा प्रत्यारोपण यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण युनिटची संख्या तेरा आहे. यासोबतच इतर सत्तावीस वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही यासंदर्भात सुवि%A