धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, घाबरलेल्या तरुणाची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील संभाजीनगर नावाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना आढळून आले होते.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 05T203218.004

छत्रपती संभाजीनगर नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन (Crime) मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्यांना नेटीझन्सकडून धमक्याही येऊ लागल्या. त्यामुळे, या तरुणांनी माफीनाम्याचा देखील एक व्हिडिओ बनवला होता. पण तरीही धमक्या थांबत नसल्याने जालन्यातील 28 वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेटीझन्स आणि सोशल मीडियातून होत असलेल्या ट्रोलिंगमुळे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील ढोकमळ तांडा येथे घडली. त्यानंतर, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सासू सुनेचं अनोख प्रेम! सासूचं निधन झाल्याच कळता सुनेचाही मृत्यू, छत्रपती संभाजीनगरातील घटना

काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील संभाजीनगर नावाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना आढळून आले होते. त्यावेळी, तिथे एका तरुणाने या लघुशंका करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काढला होता. लघुशंका करणारे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं समोर आलं होतं. या दोन्हीही तरुणांचा दुसऱ्या दिवशी माफीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये, दोन्हीही तरुणांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली होती.

त्यांनतर देखील या तरुणांचे व्हिडिओज अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आले, यात शिवसेना छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे देखील होते. त्यामुळे, मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. या धमक्यांना कंटाळून 28 वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

तत्पूर्वी, हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीन असं महेश आडे याने मित्रांजवळ बोलूनही दाखल होतं. त्यानंतर, विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. जालन्यातील ढोकमळ तांडा येथे ही घटना घडली असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

follow us