Union Budget 2023 : अर्थमंत्री बोलल्या अन् सभागृहात एकच हशा पिकला…

Union Budget 2023 : अर्थमंत्री बोलल्या अन् सभागृहात एकच हशा पिकला…

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर करताना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ ऐवजी ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असा उल्लेख केल्याने सभागृहातील नेत्यांच्या तोंडावर एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सितारामण यांना देखील हसू आवरलं नसल्याचं यावेळी दिसून आलंय.

दरम्यान, देशाचं बजेट सादर करताना अर्थमंत्री चुकल्या आहेत. अर्थमंत्री चूकल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर नेत्यांनाही हसू आवरलं नाही. सभागृहातील नेते हसल्यानंतर सीतारामण यांना आपलं चूकल्याचं लक्षात आलं. त्यांनतर त्यांनी लगेचच माफी मागत आपल्या भाषणात दुरुस्ती केली आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत आहेत. यावेळी सीतारामण देशातील वाहनांच्या धोरणावर भाषण करीत होत्या. यावेळी चुकल्याचं निदर्शनास आलं आहे. सीतारामण यांना ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ ऐवजी ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असं म्हणायचं होतं, मात्र चुकून त्यांच्याकडून हा उच्चार करण्यात आला आहे.

आपली चूक झाल्याचं समजल्यानंतर सीतारामण म्हंटल्या, सॉरी. मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. जुनी प्रदुषित वाहनं बदलली जातील. हे धोरण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख होता.

आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हंटलय. तसेच राज्य सरकारंही जुनी सरकारी वाहनं आणि जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी सहभाग घेणार असल्याचं त्यांच्याकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अगोदर यंदाच्या वर्षाचं बजेट सादर करुन अर्थमंत्री सीतारामण यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूदी केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube