Mughal Garden : राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’चं नाव बदललं, नवं नाव काय?

Mughal Garden : राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’चं नाव बदललं, नवं नाव काय?

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनच्या (Rashtrapati Bhavan)परिसरात बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनविषयी (Mughal Garden)एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्र सरकारनं (Central Government) मुघल गार्डनचं नाव बदलल्याचं समोर आलंय. मुघल गार्डनला आता ‘अमृत उद्यान’ असं नाव देण्यात आलंय. सालाबादप्रमाणं यंदाही ‘अमृत उद्यान’(Amrut Udyan) 31 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणारंय. हे उद्यान 26 मार्चपर्यंत खुलं राहणारंय. येथील फुलांचं सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून विविध पर्यटक मुघल गार्डनला भेटी देतात.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाला अमृत उद्यान असं नाव दिलंय. अमृत उद्यानात 138 प्रकारचे गुलाब, 10 हजारांपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे पाच हजार हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr.Rajendra Prasad)यांनी सर्वसामान्यांसाठी खुलं केलं होतं. तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतुमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुलं केलं जातं.

मुगल गार्डन या 15 एकर परिसरातील उद्यान निर्मिती ब्रिटिश काळात झाली. हे गार्डन राष्ट्रपती भवनाचा आत्मा असल्याचं सांगितलं जातंय. मुघल गार्डनचा एक भाग गुलाबांच्या विविध प्रकारांसाठी ओळखला जातो. राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डनची रचना इंग्रज वास्तुविशारद सर एडवर्ड लुटियंस (sir edward lutyens)यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube