Budget 2023 : हा अर्थसंकल्प ‘इंडिया फर्स्ट सिटिझन फर्स्ट’ या ध्येयाला पुढे नेईल, PM Modi

  • Written By: Published:
_LetsUpp (8)

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आर्थिक जगतात ओळख असलेल्यांचा हा आशेचा किरण घेऊन येत आहे. आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. त्यांचे संबोधन हे भारताच्या संविधानाचा, संसदीय पद्धतीचा अभिमान आहे आणि आजचा दिवस महिलांच्या सन्मानाचाही आहे.

महिलांच्या सन्मानाचा दिवस

यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींचे पहिले अभिभाषण ही आपल्या राज्यघटनेसाठी आणि विशेषत: महिलांच्या सन्मानासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. देशाच्या अर्थमंत्रीही एक महिला आहेत. उद्या त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या जागतिक परिस्थितीत भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.

‘इंडिया फर्स्ट, सिटिझन फर्स्ट’ ही सकंल्पना पुढे घेऊन आम्ही संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवू. मला आशा आहे की विरोधी पक्षाचे नेते संसदेत आपले म्हणणे मांडतील. असही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. जगाला दिसत असलेला आशेचा किरण फक्त उजळून निघेल आणि निर्मला सीतारामन त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे.

https://www.youtube.com/watch?v=FMI_RJL6n4A

follow us