…तर 50 वर्षानंतर राम मंदिराला धोका, Hindu परिषदेचा अजब दावा

…तर 50 वर्षानंतर राम मंदिराला धोका, Hindu परिषदेचा अजब दावा

नागपूर : एकीकडं अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु असताना हिंदू परिषदेकडून अजब दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल, असा दावा हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया (Pravin Togdiya) यांनी केला आहे. प्रविण तोगडीया नागपूरात बोलतं होते.

ते म्हणाले, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, जर लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल. त्यामुळे केंद्र सरकारने ही लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह भाजपाच्या बहुमताच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. त्यांनी सरकारच्या या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदाही तयार करण्याचीही त्यांनी मागणी केलीय.

तसेच लव्ह जिहाद विरोधी सरकारने कायदाही तयार करावा, असंही ते म्हणाले आहेत. अयोध्येत सध्या राम मंदिराच्या भव्य बांधकामाचं काम सुरु आहे.

दरम्यान, राम मंदिर ४५० वर्षे म्हणजे २५ पिढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे. या सरकारने काशी-मथुरा मंदिर निर्माणासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला तर त्यांना नक्की यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी असून राज्यातील अनेक भागांत या प्रमुख मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. अशातच हिंदू परिषदेकडूनही ही मागणी करण्यात आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube