Umesh Pal Murder Case प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री होणार? अहमदला मदत करणाऱ्या बिल्डरांवरही ED कारवाई

Umesh Pal Murder Case प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री होणार? अहमदला मदत करणाऱ्या बिल्डरांवरही ED कारवाई

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील उमेश पाल मर्डर केसमध्ये सीबीआयची (CBI) एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Umesh Pal Murder Case) खरं तर, सीबीआय बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्येचा तपास करत होती आणि 24 फेब्रुवारीला गोळ्या घालून ठार झालेल्या या प्रकरणातील उमेश हा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. या काळात उमेश पाल यांच्यासह एका सुरक्षा रक्षकाचीही हत्या करण्यात आली होती.

त्याचवेळी उमेश हत्या प्रकरणातील आरोपी अरबाज हा पोलिसांच्या (Police) चकमकीत मारला गेला. मात्र, उर्वरित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मृत अरबाज हा अतिक अहमदचा जवळचा सहकारी म्हणून समोर आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) दाखल झाले आहे. अतिक अहमदला मदत करणाऱ्या बिल्डर्सवर ईडी कारवाई करेल, तसेच अतिकच्या कुटुंबाला दर महिन्याला मोठी रक्कम देणारे देखील एजन्सीच्या रडारवर आहेत.

Rahul Gandhi यांच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा

अतिकच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू

या संपूर्ण हत्या प्रकरणात योगी सरकारही कडक दिसत आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी अतिक अहमदच्या नातेवाईकांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली. अवैध मालमत्तेवर कारवाई करत प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या पथकाने बुलडोझर चालवला.

अहमदच्या आतापर्यंत 16 कंपन्यांचा शोध

2021 मध्ये अतिक अहमद विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंतच्या तपासात अतिक अहमदच्या एकूण 16 कंपन्या उघड झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश कंपन्यांचा व्यवसाय रिअल इस्टेटशी संबंधित आहे. शाइस्ता परवीन या ५ नातेवाईकांच्या नावावर ३ कंपन्या नोंदणीकृत आहेत, तर ८ कंपन्या अशा आहेत ज्यांची नावे स्पष्ट नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube