धक्कादायक! जेवणात ‘टीबी’ बॅक्टेरिया मिसळण्याचा कट; डॉक्टरनेच केला पर्दाफाश, दोघे फरार

धक्कादायक! जेवणात ‘टीबी’ बॅक्टेरिया मिसळण्याचा कट; डॉक्टरनेच केला पर्दाफाश, दोघे फरार

Baghpat News : उत्तर प्रदेशातील बागपत डेप्यूटी (Baghpat News) सीएमओ आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यशवीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबाला संपविण्यासाठी मोठा कटाचा खुलासा झाला आहे. या प्रकाराने आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. सिंह यांना जेवणातून टीबी रुग्णांचे सॅम्पल देऊन मारण्याचा प्लॅन रचण्यात आला होता. या कटाचा उलगडा झाल्यानंतर दोन संशयित आरोपी घर सोडून पळाले. रुग्णालयाचे सीएमओ डॉ. यशवीर सिंह यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आधिक माहिती अशी, टीबी-एचआयव्ही विभाग समन्वयक जब्बार खान आणि निवासी एक लॅब टेक्निशियन या दोघांनी डॉ. सिंह यांच्या भोजनात क्षयरुग्णांचे सॅम्पल मिसळण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी आणखी एका चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यावरही दबाव टाकला. परंतु, या कर्मचाऱ्याने फोन रेकॉर्ड करून हा सगळा प्रकार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.

उत्तर प्रदेशात पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीची जमीन; शत्रूच्या संपत्तीची होणार विक्री..

यानंतर डॉ. सिंह यांनी जेवणात टीबी रुग्णांचे सॅम्पल आणि अन्य केमिकल मिसळून आपल्याला मारण्याची कट रचल्याचा आरोप दोघांवर केला. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रारही दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ तपास सुरू केला. या आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्यांच्या घरीही छापा टाकला. परंतु, आरोपी येथूनही पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या प्रकरणी सीओ हरिश भदौरिया यांनी प्रतिक्रिया देत लवकरच या दोन्ही आरोपींना अटक करू असे सांगितले.

क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांच्या या करारनाम्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश संयुक्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी सांगितले की बाहेरून येणाऱ्या खाद्य पदार्थांवरील विश्वास आता पूर्णपणे उठला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घरूनच खाद्यपदार्थ घेऊन यावेत असे आवाहन केले आहे.

या प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील क्षयरुग्णांच्या सॅम्पलचा विभाग सील केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे पोलीस लवकरच सील केलेला कक्ष उघडून तपास करणार आहेत. रुग्णांच्या सॅम्पलचीही गणना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने आरोग्य विभागात मात्र खळबळ उडाली आहे. खाद्य पदार्थांच्या बाबतीत अनेक बातम्या कानावर येत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओही व्हायरल होत असतात. अशा पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. आताही असाच प्रकार बागपतमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

बीडमधील 300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; अध्यक्षाला उत्तर प्रदेशमध्ये ठोकल्या बेड्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube