ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran Actor,director Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Actor) उपचार सुरू होते.
मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘मेरे देश की धरती सोने उगला’ आणि ‘भारत की बात सुनाता हूं’ यांसारख्या गाण्यांमधून देशातील आबालवृद्धांत लोकप्रिय झाले. मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अॅबटाबाद येथे 1937 साली झाला होता. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. असं म्हटलं जातं की, भगतसिंग यांच्यावर या अभिनेत्याचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले.
मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. मनोज हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशाची कहाणीही बरीच रंजक आहे. असं म्हटलं जातं, की एकदा ते कामाच्या शोधात एका फिल्म स्टुडिओमध्ये फिरत होते. त्यांनी त्यांना सांगितलं की ते काम शोधत आहेत. त्यांना इथे काम मिळालं पण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणारे दिवे आणि इतर आवश्यक उपकरणे उचलून हलवावी लागली. त्यांनी आपले काम परिश्रमपूर्वक केले आणि नंतर त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागलं.
Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the nickname 'Bharat Kumar', passes away at the age of 87 at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital. pic.twitter.com/nHvvVDT2CY
— ANI (@ANI) April 4, 2025