Budget 2023 : निर्मला सीतारामन यांचा षटकार : ज्येष्ठ, महिला, मध्यमवर्गासाठी अमृत बजेट
Live Updates: (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) आज सादर केला.
देशात 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी चांगली बातमी दिली आहे. सोबत आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे.
सीतारामन यांच्या भाषणातल्या संपूर्ण घोषणा आणि अपडेटसाठी वाचा
LIVE NEWS & UPDATES
-
विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प: सुधीर मुनगंटीवार
हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प आहे.
-
व्यंगचित्रांतून काँग्रेसची बजेटवर टीका.
आजच्या बजेटवर काँग्रेस पक्षाने एका चित्राच्या माध्यमातुन टीका केली. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नरेंद्र मोदींचा योगासन करतानाचा फोटो ट्विट केला आहे. केंद्र सरकार दावा करताना आलेख वर गेल्याचं सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात आलेख खाली जात आहे. असा चित्र या फोटोमध्ये दिसून येत आहे.
बजट खत्म हुआ
Claim Reality pic.twitter.com/MEDSXINZHR
— Congress (@INCIndia) February 1, 2023
-
सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो - मुख्यमंत्री @mieknathshinde #Budget2023
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 1, 2023
-
Budget 2023 : सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्ती कर नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी करधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची
(income tax) मर्यादा सात लाख इतकी केली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.https://letsupp.com/national/finance-minister-nirmala-sitharaman-made-a-big-announcement-for-taxpayers-/9421.html
-
Budget 2023 : देशात डाळींसाठी ‘विशेष हब’ करणार
प्रत्येक राज्यातील ज्या भागात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा भागात म्हणजे विभागनिहाय डाळींसाठी ‘विशेष हब’ तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना (Farmer) वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच त्यांना बाजारभाव देखील चांगला मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतरामन (Nirmala Sitaraman) यांनी केली.
https://letsupp.com/national/nirmala-sitaramn-union-budget-/9407.html
-
Stock Market Spike: बजेट नंतर शेरमार्केट सुसाट आणि नंतर पडले
अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली.
https://letsupp.com/latestnews/after-the-budget-the-stock-market-rose-and-then-fell-/9450.html
-
Budget 2023 : रुपया येणार कसा आणि जाणार कसा?
गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारत यावर मोठा भर दिलाय.
वाचा सविस्तर
https://letsupp.com/national/how-will-the-rupee-come-and-go-read-in-detail-/9457.html
-
विरोधकांकडून चांगलं बोलण्याची अपेक्षा नव्हतीच - सुजय विखे पाटील
अर्थमंत्र्यांनी सगळ्यात मोठा दिलासा कररचनेत वाढवण्यात आलेल्या स्लॅबच्या रुपाने मिळाला आहे. हे वाचणारे पैसे बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून येतील.
अस असलं तरी विरोधकांकडून बजेटबद्दल चांगलं बोलण्याची अपेक्षा नव्हती. अस मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
-
नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू करणार

-
आजचा अर्थसंकल्प म्हणजे स्त्रीशक्ती मजबूत राष्ट्र कसे घडवू शकते याचे प्रतिबिंब
या अर्थसंकल्पामुळे महिलांचा सन्मान वाढला, तरुणांसाठी डिजिटल लायब्ररीच्या घोषणेने जिल्हास्तरावर मुले वाचतील आणि प्रगती करतील याचा उल्लेख करण्यात आला. आजचा अर्थसंकल्प म्हणजे स्त्रीशक्ती मजबूत राष्ट्र कसे घडवू शकते याचे प्रतिबिंब आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
-
खास लोकांनी खास लोकांसाठी बनवलेला अर्थसंकल्प
डोळे मिटून गुणगान गाणारा अर्थसंकल्प बनवला तर काही साध्य होणार नाही. रोजगाराबद्दल फक्त गोलगोल बोलला. हा अर्थसंकल्प खास लोकांनी खास लोकांसाठी बनवलेला अर्थसंकल्प आहे. आरजेडी खासदार मनोज झा यांची टीका.
मैंने वित्त मंत्री को कई बार कहा है कि जब भी बजट बनाए तो अनुच्छेद 39 को देख लें। संविधान से आंखें मूंद कर स्तुति गान वाला बजट बनाते हैं तो कुछ हासिल नहीं होगा। रोजगार के लिए आपने गोल-गोल बातें की। ये बजट खास लोगों का खास लोगों द्वारा खास तरह से बनाया बजट है: RJD सांसद मनोज झा pic.twitter.com/R6b2NiENhO
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2023
-
शेअर बाजाराकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
अर्थसंकल्प सादर झाल्य नंतर शेअर बाजाराने याचे स्वागत केल्याचे दिसून आले. आज दुपारी १ वाजता सेन्सेक्समध्ये १००० हजार अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ६०,५५० पर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीत जवळपास २२५ अंकाची वाढ होऊन १७,९०० च्या पुढे निफ्टी पोहोचला.
-
काही चांगल्या गोष्टी, पण... - शशी थरूर
अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण या अर्थसंकल्पात मनरेगा योजना याशिवाय ग्रामीण भागातील गरीब मजूर, रोजगार आणि महागाईबाबत यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहेत.
There are some good things in #UnionBudget2023 but there was no mention of MNREGA, poor rural labour, employment & inflation. Some fundamental questions remained to be answered: Congress MP Shashi Tharoor pic.twitter.com/bgRdzhgj18
— ANI (@ANI) February 1, 2023
-
मध्यमवर्गीयांचा अर्थसंकल्प म्हणता येईल - देवेंद्र फडणवीस
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. विशेषत: पुढच्या २५ वर्षांत आपण म्हणत असलेल्या विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे. असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले की विरोधकांनी सकाळीच ठरवलं होतं की अर्थसंकल्प कसाही असला, तरी त्यावर टीकाच करायची. त्यांनी अर्थसंकल्प बघितलाही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही.
Speaking on #AmritKaalBudget.#Budget2023 #UnionBudget https://t.co/UDfEtzjoqE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2023
-
Budget 2023 : वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन
वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन, 157 नवे नर्सिंग कॉलेजेस तसेच ICMR लॅब्सना अद्ययावत सुविधा प्राप्त करुन देणे, यासह काही महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केल्या.
-
Budget 2023 : गरीब जनतेला एक वर्ष मोफत धान्य देणार
1 जानेवारी 2023 पासून एक वर्षासाठी सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची योजना राबवणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली.
-
Budget 2023 : बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राला संजीवनी
2014 पासून आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या 157 मेडिकल कॉलेज सह-संस्थांच्या रूपात 157 नव्या नर्सिंग कॉलेजांची स्थापना करण्यात येईल. मेडिकलच्या अभ्यासासाठी बहुविध विषयांच्या साहित्याची व्यवस्था करण्यात येईल.
Union Budget 2023 : बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राला संजीवनी : 157 नव्या नर्सिंग कॉलेजांची स्थापना करण्यात येणार https://t.co/3CCRemw2ba #UnionBudget2023 #NirmalaSitharaman #Nursing #education #MarathiNews #letsuppmarathi
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 1, 2023
-
Budget 2023 : काय स्वस्त, काय महाग ?
काही वस्तूंवरील कर वाढविण्यात आला आहे. तर काही वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे#Tax #Budget2023 #marathinews #news #letsuppmarathi #letsuppnews pic.twitter.com/Mh2g5wgr9G
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 1, 2023
-
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प, सुनील तटकरे यांचा टोला
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
-
मुंबईच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम
मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा झाली आहे. अशी टीका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली आहे. मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम अर्थसंकल्पात झालं आहे. असं राऊत म्हणाले.
-
Budget 2023 : रेल्वेसाठी अर्थसंकल्पामध्ये काय ?

-
Budget 2023 : ऊर्जा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये काय ? वाचा

-
Budget 2023 : देशात डाळींसाठी ‘विशेष हब’ करणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने डाळींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात (Union Budget) विशेष घोषणा केली आहे. कृषीपूरक व्यवसाय, नवीन स्टार्टअप, कृषीकर्ज, मत्स्य व्यवसाय, कापूस, डाळी यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
https://letsupp.com/national/nirmala-sitaramn-union-budget-/9407.html
-
Budget 2023 : स्वस्त काय महाग काय ?
काय स्वस्त होणार?
मोबाईल
टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक वाहने
खेळणी
कॅमेरा लेन्स
सिगरेटकाय महाग?
सोने-चांदी दागिने महागणार
विदेशी किचन चिमणी
चांदीचे दागिने
चांदीची भांडीhttps://letsupp.com/national/union-budget-2023-whats-costlier-whats-cheaper-mobile-phone-electric-vehicles-cheaper-silver-jewellery-/9406.html
-
नवीन टॅक्स स्लॅब असे असणार
नवीन टॅक्स स्लॅब असे असणार
३ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त
₹३ ते ६ लाख - ५ टक्के कर
६ ते ९ लाख- १० टक्के
९ ते १२ लाख - १५ टक्के
१२ ते १५ लाख - २० टक्के
१५ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के कर भरावा लागणार
New Tax Slab
-
Union Budget 2023 : पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी (infrastructure Sector) मोठी तरतूद केली आहे. ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर (Transport Infra Project) 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
https://letsupp.com/national/union-budget-2023-huge-budget-provision-for-infrastructure-/9392.html
-
मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा : सात लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्ती कर नाही
मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा : सात लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्ती कर नाही
-
शेतकरी दोन लाखापर्यंतचे कर्ज रोख भरू शकणार.
शेतकरी दोन लाखापर्यंतचे कर्ज रोख भरू शकणार. प्राथमिक कृषी सोसायटी आणि ग्रामीण बँकांमध्ये ही सुविधा असणार
-
स्टार्टअपसाठी विशेष घोषणा
स्टार्टअपसाठी विशेष घोषणा
स्टार्टअपसाठी आयकरामधून आणखी एका वर्षाची सवलत
-
Budget 2023 : देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढणार- निर्मला सीतारामन
Budget 2023 : अर्थसंकल्पात देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023-24 साठी7 टक्के दराने वाढणार आहे. (Budget 2023) अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.
सविस्तर वाचा
https://letsupp.com/national/nirmala-sitharaman-said-the-country-economy-will-grow-rate-of-7-percent-/9380.html