देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Delimitation Bill : देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर चर्चा आणि पुढील कार्यवाहीसाठी 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.