मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर; चर्चांना आले उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर; चर्चांना आले उधाण

मुंबई : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच राजकारणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यातील अनेक दिग्गज नेते हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहे. यातच राज ठाकरे देखील नागपूर दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहे.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करतील. स्थानिक प्रश्न काय आहेत? ते सोडवण्यासाठी काय उपाय करता येतील, याबाबतही ते मनसौनिकांशी चर्चा करतील. तसंच नव्या शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube