Maharashtra Bhushan Award : ‘वातावरणात अचानक बदल झाल्याने उष्माघाताचा त्रास, कोणीही राजकारण करु नये’

Maharashtra Bhushan Award : ‘वातावरणात अचानक बदल झाल्याने उष्माघाताचा त्रास, कोणीही राजकारण करु नये’

Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यानच्या दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल झाला. ऊन वाढल्याने 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ झाली होती. याचा परिणाम महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर झाला. उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याचं कुणीही राजकीय भांडवल करू नये, असे अवाहन उद्योग मंत्री उदय सावंत (uday samant) यांनी केलं आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्घटनेत उष्माघाताने 13 वा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये राहणाऱ्या गुलाब पाटील या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या नियोजनावर विरोधकांकडून टीका केली जातीय. तेथील व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उदय सामंत म्हणाले, मोठ्या संख्येने श्रीसदस्य जमले होते. त्यांना पाण्यापासून सर्व वैद्यकीय सुविधी पुरवल्या होत्या. दुर्दैवाने उष्माघाताने ही घटना घडली. अनेक श्रीसदस्यांशी चर्चा करुन हा कार्यक्रम केला होता. पण दुर्दैवाने काही राजकारणी याचे देखील राजकारण करत आहेत. एकत्र येऊन श्रीसदस्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करणे, सरकारची कशी चुक आहे हे दाखवणे यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. अशा संकटाच्या काळात सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. कोणत्याही प्रसंगात सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचे, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, अशा मानसिकतेमधून बाहेर येऊन विचार करायची गरज आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

राम मंदिराला भरघोस देणगी देणाऱ्या महंतांचा भीषण अपघातात मृत्यू

उदय सामंत पुढं म्हणाले की, श्रीसदस्यांनी कार्यक्रम सकाळी ठेवण्याची विनंती केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यक्रमस्थळी सर्व वैद्यकीय सुविधी सज्ज होत्या. हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 रुग्णांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात ब्लड बॅकेपासून प्राथमिक उपचारांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. 150 नर्स होत्या, 73 रुग्णवाहिका होत्या, चार हजार बेडचं हॉस्पिटल तयार केले होते. अनेक हॉस्पिटलमधील बेड राखीव ठेवले होते. रेल्वे स्टेशनवरुन येण्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. प्रशासनाकडून श्रीसदस्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube