Shiv Sena@57 : प्रमोद महाजनांचं 25 वर्षांपूर्वीचं भाकित खरं ठरलं अन् भाजप मोठा भाऊ झाला…

Shiv Sena@57 : प्रमोद महाजनांचं 25 वर्षांपूर्वीचं भाकित खरं ठरलं अन् भाजप मोठा भाऊ झाला…

Shiv Sena Anniversary : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. सुरुवातीला ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मराठी माणूस’ केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेची वाटचाल सुरु झाली होती. 1984 च्या रामजन्मभूमी आंदोलननंतर शिवसेनेने हिंदुत्वाकडे वळण्यास सुरुवात केली. यातूनच भाजप आणि शिवसेनेचे सुत जुळत गेले. त्याकाळी शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असं राज्यातील राजकीय समीकरण होतं. त्यामुळे युतीचे जागा वाटप करण्यासाठी किंवा बाळासाहेबांची मर्जी राखण्यासाठी भाजप नेत्यांची ‘मातोश्री’वर नेहमीच धावपळ होत होती.

शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरुनच महाराष्ट्रात भाजपने आपले हातपाय पसरवले. स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी युतीच्या काळात कधीही बाळासाहेबांची नाराजी ओढावून घेतली नव्हती. युती शिल्पकार असलेल्या तिन्ही नेत्यांच्या निधनानंतर नवीन पिढीच्या हातात युतीचे सूत्र आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलत गेला.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

2014 नंतर भाजपची महाराष्ट्रातील सगळी सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. फडणवीसांनी हळूहळू युतीमधील शिवसेनेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनेक उमेदवार भाजपने पाडले असा आरोप देखील शिवसेनेकडून केला जातो. 2014 च्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कमी दर्जाची खाती देवून बोळवणं केली होती. या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेने सत्तेत राहुन विरोधी पक्षांची भूमिका बजावली होती. भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नव्हती. यातून भाजप आणि शिवसेनेत दुरावा येत गेला. आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…

आज शिवसेना आपला 57 वा वर्धपान दिन साजरा करत आहे पण शिवसेनेचे दोन सोहळे होते आहेत. एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या मेळावा होतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मेळावा घेत आहेत. शिंदेंची शिवसेना आणि भाजपची महाराष्ट्रात सत्तेत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी देखील ह्या युतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

भाजपची पूर्वीपासूनच महाराष्ट्रात नंबर वन पार्टी होण्याची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजप महाराष्ट्राची नंबर वन पार्टी होणार हे 25 वर्षापूर्वी भाजप नेते प्रमोद महाजन यांनी सांगितले होते. हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही दिवसांपूर्वी सांगितला होता. पूर्वीपासून भाजपचे लक्ष होते की शिवसेना कमजोर झाली की आपल्याला त्याचा फायदा होईल. यावर भाजपने अनेक वर्षे काम केले, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube