‘एखाद्या सदस्याला अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळं जीव गमवावा लागेल’; शेकापच्या जयंत पाटलांची नाराजी

Untitled Design   2023 03 25T130659.492

मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Legislative Session) शेवटा दिवस आहे. हे अधिवेशन अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे ह्या विधिमंडळात आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा विधिमंडळातील हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्यांनी विधिमंडळातून काढता पाय घेतला होता. माध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान, आता विधिमंडळात शेकापचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांना आरोग्यविषयक सुविधा न मिळाल्यानं त्यांनी सभागृहात आपली नाराजी बोलून दाखवली.

 

आज सभागृहात जयंत पाटील यांची तब्येत जरा ठीक नव्हती. त्यामुळं त्यांनी विधिमंडळातील डॉक्टरांकडे जाऊन तसं सांगिलतं. तेव्हा संबंधित डॉक्टरांनी पाटील यांना सध्या इथं लोक नाहीत, तुम्ही बारा वाजता. तेव्हा तुमचं चेकअप करू असं सांगण्यात आलं.

Abhijit Bichukale यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! ‘महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट, आता…

या प्रकाराविषयी सभागृहात बोलतांना पाटील यांनी सांगितलं की, विधिमंडळाच्या परिसरात विधिमंडळ चालू असतांन विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. आता आपल्याकडे आमदार निवास नाही. पूर्वी आमदार निवासात असायचे. तेव्हा तिथं डॉक्टर असायचे. आज विधिमंडळात मी स्वत: आजारी पडलो. डॉक्टरकडे गेलो आणि सांगितलं की माझं रक्त तपासायचं, तेव्हा सांगण्यात मला आलं की, बारा वाजता लोक येतील तेव्हा करा. इथं 24 तास सुविधा पाहिजेत. आपलं खातं काय करत, हे पाहिलं पाहिजे. कोणाला अॅटक आल्यावर ते संबंधित डॉक्टर बारा वाजता सदनाच्या सदस्याला यायला सांगितलं का? असा सवाल करत हे प्रकरणं गंभीरतेनं घेतलं पाहिजे, अन्यथा एखाद्या सदस्याला या अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळं जीव गमवावा लागेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी हे प्रकरणं फार गंभीर असून याची दखल मी घेतली आहे. पुढच्या अधिवेशाच्या वेळेस अशी वैद्यकीय गैरसोय होणार नाही. सदनाच्या सदस्यांसाठी पुर्णवेळ डॉक्टर राहतील याची काळजी घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube